फोन सतत हँग होतोय? फक्त ‘हे’ बटण आठवड्यातून एकदा दाबा!

स्मार्टफोनच्या चांगल्या परफॉर्मन्स, बॅटरी लाइफ आणि सुरक्षेसाठी आठवड्यातून एकदा तरी आम्ही सांगितलेली ही एक सोपी पण प्रभावी सवय अवश्य पाळा. कारण ही सवय तुम्हाला नवीन फोन खरेदी करण्याची गरज कमी करू शकते आणि तुमचा सध्याचा फोन अधिक काळ टिकवण्यास मदत करू शकते.

फोन सतत हँग होतोय? फक्त हे बटण आठवड्यातून एकदा दाबा!
स्मार्टफोन चालत नाहीये स्मूद?
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 22, 2025 | 2:26 PM

स्मार्टफोनच्या वापरामुळे आज आपलं आयुष्य सहज आणि तंत्रज्ञानाशी जोडलेलं झालं आहे. मात्र, अनेकदा आपण फोन स्लो होतोय, हँग होतोय यामुळे त्रासून जातो. मग काही जण लगेच सर्व्हिस सेंटरला धाव घेतात, तर काहीजण नवीन फोन घेण्याचा विचार करतात. पण एक छोटीशी सवय तुम्हाला हे खर्च वाचवू शकते, आणि तुमचा स्मार्टफोन पुन्हा नव्यासारखा स्मूद चालवू शकते. ती सवय म्हणजे—फोन रीस्टार्ट करणे!

फोन स्लो होण्याचं मूळ कारण काय?

वेळोवेळी फोनमध्ये टेम्पररी फायली, कॅशे डेटा आणि बॅकग्राउंड अ‍ॅप्स साठत जातात, जे फोनच्या प्रोसेसिंगवर परिणाम करतात. यामुळे फोन हँग होणे, अ‍ॅप्स क्रॅश होणे किंवा बॅटरी लवकर संपणे अशा समस्या दिसून येतात. यावर अतिशय सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा फोन रीस्टार्ट करणे.

रीस्टार्टचा फायदा काय?

जेव्हा आपण फोन रीस्टार्ट करतो, तेव्हा RAM क्लियर होते, बॅकग्राउंडमध्ये चालणारी अ‍ॅप्स बंद होतात आणि संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम ‘रिफ्रेश’ होते. त्यामुळे फोन हलका, जलद आणि स्मूद चालतो. तसेच, फोनचा ‘क्रॅश’ होण्याचा धोका कमी होतो.

किती वेळा करावा रीस्टार्ट?

मोबाईल कंपन्यांचे वेगवेगळे सल्ले आहेत. Samsung च्या मते Galaxy फोन रोज रीस्टार्ट केला पाहिजे, तर T-Mobile आणि इतर एक्सपर्ट्सच्या मते आठवड्यातून एकदा तरी फोन रीस्टार्ट करणं पुरेसं आहे. काही तज्ञ आठवड्यातून २-३ वेळा रीस्टार्ट करणेही फायदेशीर मानतात.

बॅटरी हेल्थही राहते चांगली

फोन रीस्टार्ट केल्यावर बॅकग्राउंड प्रोसेसेस थांबतात, जे बॅटरीचा अनावश्यक वापर करतात. त्यामुळे फोनवर एकाच चार्जमध्ये अधिक वेळ काम करता येतं आणि बॅटरी लाइफही चांगली राहते.

सिक्युरिटी वाढवते ही सवय

कधी कधी फोनमध्ये काही संशयास्पद अ‍ॅप्स किंवा नेटवर्क कनेक्शन्स वापरकर्त्याला न कळता चालू राहतात. रीस्टार्ट केल्याने अशा अ‍ॅक्टिव्हिटीज थांबतात आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर नव्याने सुरू होऊन संभाव्य जोखमीपासून संरक्षण मिळते.

नेटवर्क कनेक्टिव्हिटीही होते मजबूत

कधी फोन Wi-Fi किंवा मोबाइल नेटवर्कला नीट कनेक्ट होत नाही. अशा वेळी रीस्टार्ट केल्यास नेटवर्क पुन्हा रिफ्रेश होतं आणि कनेक्टिव्हिटी समस्या दूर होतात. हे एक प्रकारचं ‘मिनी रिसेट’ म्हणून कार्य करतं.

किती रीस्टार्ट योग्य?

विशेष तज्ज्ञ सांगतात की दररोज अनेक वेळा फोन रीस्टार्ट करणं आवश्यक नाही. यामुळे कोणताही अतिरिक्त फायदा होत नाही आणि इंटर्नल कंपोनेंट्सवर काहीसा ताण येऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा फोन रीस्टार्ट करणं हे एक परिपूर्ण आणि योग्य उपाय आहे.