Jio : एकदाच रिचार्ज आणि Jio सिम राहील कायम अॅक्टिव्ह, Jio च्या या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा, फ्रि Ai इमेज जनरेशन आणि बरंच काही

Jio च्या या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. यासोबत Unlimited Voice Calls रोमिंग, आणि दररोज 100 SMS ची सुविधा मिळते. तसेच 18 महिन्यांचे Gemini subscription देखील मिळणार आहे. त्यामुळे jio च्या ग्राहकांसाठी हा प्लॅन मोठ्या फायद्याचा ठरणार आहे.

Jio :  एकदाच रिचार्ज आणि Jio सिम राहील कायम अॅक्टिव्ह, Jio च्या या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा, फ्रि Ai इमेज जनरेशन आणि बरंच काही
JIO RECHARGE
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 3:23 PM

Jio चा 859 रूपयांचा रिचार्ज प्लॅन सध्या ग्राहकांसाठी मोठ्या फायद्याचा ठरत आहे. सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी दर महिन्याला रिचार्ज मारायला लागत होता.पण या प्लॅनमुळे तस काहीही करण्याची गरज लागणार नाही. हा पॅक 84 दिवसांची वैधता देणार आहे. त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिडेट डाटा देणार आहे. यासोबतच Ai फिचर Gemini फ्रिमध्ये वापरता येणार आहे.

या 859 रूपयांच्या प्लॅनची वैधता ही 84 दिवसांची आहे. त्यामुळे दररोज Jio च्या ग्राहकांना 2GB HIGH SPEED डेटा वापरता येणार आहे.म्हणजेच संपूर्ण पॅकमध्ये 168GB वापरता येणार आहे. त्यामुळे हा Jio यूजर्ससाठी फुल पैसा वसूल रिचार्ज ठरणार आहे.

Loading...

दररोज ज्यांना भरपूर इंटरनेटची गरज असते. अश्या लोकांसाठी हा प्लॅन खूपच फायद्याचा ठरणार आहे. या पॅकची वैधता 84 दिवसांची तर आहेच पण त्यासोबत डेली 2GB हायस्पीड 4G डेटा मिळणार आहे. तसेच रोमिंग किंवा कॉलिंगसाठी वेगळा रिचार्ज मारण्याची गरज लागणार नाही. देशभरातलील कोणत्याही नेटवर्कवर Unlimited local, std आणि रोमिंग कॉल करता येणार आहेत. याशिवाय दररोज १०० SMS करता येणार आहेत. पण फक्त ज्यांच्याकडे 5G चा फोन आहे अशा लोकांसाठी काही वेळेस Unlimited 5G डेटा मिळण्याची वापरता येणार आहे.

Ai वर फोटो, व्हिडिओ बनवण्यासाठी फ्री Gemini सबस्क्रिप्शन

या रिचार्जचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे google gemini pro चे 18 महिन्यांचे सबस्क्रिप्शन. Jio ने जाहीर केलेल्या माहितीनुसार या ऑफरची किंमत मुळात 35,100 आहे पण खास Jio च्या ग्राहकांसाठी फ्रिमध्ये देण्यात आले आहे. यासोबतच 5TB क्लाउड स्टोरेज, Gemini मधील आणखी Ai सुविधा, इमेज जनरेशन , google workspace च्या सुविधा देखील मिळणार आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us