AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Offer : Jio यूजर्ससाठी खास बातमी, अमर्यादित कॉलिंग आणि डेटा फक्त 91 रुपयात, ऑफर जाणून घ्या…

Jio सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन तुम्हाला माहित आहे का, 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना रोज डेटा देखील मिळेल. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सारखे फायदेही दिले जात आहेत. जाणून घ्या....

Jio Offer : Jio यूजर्ससाठी खास बातमी, अमर्यादित कॉलिंग आणि डेटा फक्त 91 रुपयात, ऑफर जाणून घ्या...
जिओ ऑफरImage Credit source: social
| Updated on: Aug 09, 2022 | 6:09 AM
Share

मुंबई : रोज वाढणारे इंधनाचे दर, वाढती महागाई, सगळ्याच गोष्टींच्या वाढणाऱ्या किंमत पाहता आता दैनंदिन वापराच्या गोष्टीतही पैसे खर्च करताना विचार करावा लागतो. कारण, तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही घ्यायची आहेच. पण, आपण त्यात कोणती गोष्ट स्वस्त मिळणार, रिचार्ज (Recharge) स्वस्तात मिळणार का, कमी पैसे आणि अधिक वैधता देतील का, याचाही विचार करू लागतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक तुमच्या कामाची बातमी सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की जिओ (Jio Offer) वापरकर्त्यांकडे 100 रुपयांच्या खाली एक उत्तम रिचार्ज पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला या प्लानबद्दल सांगत आहोत. कंपनी 91 रुपयांचा प्लान ऑफर करते. ज्यामध्ये कॉलिंगपासून डेटापर्यंत सर्व सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये यूजर्सला रोजचा डेटाही मिळेल. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस (SMS) सारखे फायदेही दिले जात आहेत. Airtel-Vi देखील Jio च्या 91 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत दोन प्लॅन ऑफर करते परंतु त्यांची किंमत अनुक्रमे 99 आणि 98 रुपये आहे.

जिओचा 91 रुपयांचा प्लॅन

या प्लानमध्ये यूजर्सना दररोज 100MB डेटा दिला जातो. अतिरिक्त 200MB डेटा देखील दिला जात आहे. त्याची वैधता 28 दिवस आहे. संपूर्ण वैधता दरम्यान, वापरकर्त्यांना 3GB डेटा दिला जात आहे. जेव्हा एका दिवसाची मर्यादा संपेल तेव्हा तुम्हाला 64 Kbps चा स्पीड मिळेल. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जाणार आहे. त्याच वेळी, याशिवाय, Jio अ‍ॅप्सचे विनामूल्य सदस्यता देखील उपलब्ध आहे. हा प्लान फक्त JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे.

Vodafone Idea चा 98 रुपयांचा प्लान

या प्लानची वैधता 15 दिवस आहे. यामध्ये 200MB डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. यामध्ये तुम्हाला SSS लाभ मिळत नाही.

Airtel चा 99 रुपयांचा प्लान

Vodafone Idea प्रमाणेच यामध्ये देखील 200MB डेटा दिला जात आहे. त्याची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये यूजर्सना 99 रुपयांचा टॉकटाइम दिला जात आहे. याशिवाय कॉलिंगसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद शुल्क आकारले जाईल. त्याचवेळी एसटीडी एसएमएस करण्यासाठी 1.5 रुपये द्यावे लागतील. याशिवाय 1 रुपये स्थानिक एसएमएस शुल्क भरावे लागेल.

महागाईत मोबाईल रिचार्ज घेतानाही विचार करावा लागत आहे. तुम्हाला आम्ही वरीलप्रमाणे स्वस्त प्लॅन सांगितले आहे. ते पाहा आणि तुम्हाला जो परवडेल तो प्लॅन घ्या त्यासह पैसेही वाचवा.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.