जिओच्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, कंपनीची ‘ही’ सेवा 3 महिन्यांसाठी मिळणार फ्री
जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने युजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे. यात कंपनी आपल्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 3 महिन्यांचे JioSaavn Pro चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने युजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे. यात कंपनी आपल्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 3 महिन्यांचे JioSaavn Pro चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. युजर्स MyJio अॅपच्या मदतीने या ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत. या ऑफरचा लाभ घेणारे युजर्स कोणत्याही जाहिरातीशिवाय JioSaavn अॅपवर गाणी ऐकू शकणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
JioSaavn Pro चे तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी 299 रुपये मोजावे लागतात. मात्र Jio च्या ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत ही सेवा मोफत सक्रिय करता येणार आहे. यासाठी, ग्राहकांना MyJio अॅपवर जावे लागेल. त्यानंतर, त्यांना ऑफर स्टोअरवर क्लिक करावे लागेल. युजर्स अॅपमधील सर्च आयकॉनवर टॅप करून ऑफर स्टोअर शोधू शकतात. यानंतर ऑफर स्टोअरच्या बॅनरवर JioSaavn Pro ऑफर दिसेल.
जनरेट कोड
बॅनरवर टॅप केल्यानंतर एक नवीन टॅब उघडेल, यावर तुम्हाला JioSaavn Pro चा तीन महिन्यांचा मोफत ट्रायल कोड जनरेट करण्याचा पर्याय दिसेल. मात्र यासाठी काही अटी आणि शर्ती देखील असणार आहेत. त्यानंत जनरेट कोड पर्यायावर टॅप केल्यानंतर, युजर्सना एक कोड मिळेल. हा कोड JioSaavn अॅपमध्ये टाकावा लागेल.
कोड कसा रिडीम करायचा
कोड रिडीम करण्यासाठी JioSaavn अॅप किंवा वेबसाइट उघडा. नंतर प्रो पेजवर जा. येथे 1 महिन्याचा प्रो वैयक्तिक प्लॅन निवडा. नंतर जनरेट केलेला कोड टाका करा. यानंतर, खाली स्क्रोल करा आणि Apply Coupon Code वर टॅप करा. कूपन कोड रिडीम केल्यानंतर, वापरकर्त्यांना JioSaavn Pro चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.
अटी शर्ती काय आहेत?
कंपनीने अटी आणि शर्तींमध्ये म्हटले आहे की, ही ऑफर फक्त JioSaavn च्या नवीन युजर्ससाठी आहे. जे युजर्स आधीच JioSaavn Pro सबस्क्रिप्शन चालवत होते त्यांना ही ऑफर मिळणार नाही. तसेच हा प्रोमो कोड इतर कोणत्याही डिस्काउंट कोड किंवा ऑफरसह अप्लाय करता येणार नाही. तुम्ही जर जिओ वापरकर्ते असाल तर तुम्हाही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
