नववर्षानिमित्त जिओची धमाकेदार ऑफर, 501 रुपयांत मोबाईल

मुंबई : रिलायन्स जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स बाजारात आणल्या आहेत. 399 रुपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक ऑफर फक्त नवीन ग्राहकांसाठी दिली जात आहे. जिओने फक्त 1095 रुपयांत ‘जिओ फोन न्यू ईयर ऑफर’ घेऊन आला आहे. ज्यामध्ये युजर्सला नवीन जिओ फोनसोबत फ्री डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे. जिओ फोन न्यू ईयर ऑफरमध्ये नवीन […]

नववर्षानिमित्त जिओची धमाकेदार ऑफर, 501 रुपयांत मोबाईल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : रिलायन्स जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स बाजारात आणल्या आहेत. 399 रुपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक ऑफर फक्त नवीन ग्राहकांसाठी दिली जात आहे. जिओने फक्त 1095 रुपयांत ‘जिओ फोन न्यू ईयर ऑफर’ घेऊन आला आहे. ज्यामध्ये युजर्सला नवीन जिओ फोनसोबत फ्री डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे.

जिओ फोन न्यू ईयर ऑफरमध्ये नवीन ग्राहकांना 501 रुपयामध्ये जिओ फोन मिळणार आहे आणि पुढील सहा महिन्यांसाठी 99 रुपयांचे व्हाऊचर्स दिले जाणार आहे. तसेच व्हॉईस कॉलिंग आणि डेटा फक्त 1095 रुपयांत मिळणार आहे. ही स्कीम जिओ फोनने मान्सून हंगामी ऑफरसोबत जोडलेली आहे तसेच नवीन जिओ फोनच्या बदल्यात तुम्हाला कोणतेही जुने फीचर फोन एक्सचेंज करावा लागणार आहे.

ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला जिओच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. वेबसाईटवरुन तुम्हाला ‘जिओ फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड’ खरेदी करावे लागणार आहे. यानंतर कंपनी तुम्हाला कार्ड डिलीव्हरी करेल किंवा तुम्हाला रिलायन्स जिओच्या स्टोअरला जाऊन कलेक्ट करावे लागले. या कार्डसोबत तुम्हाला तुमचा जुना फीचर फोन चार्जिंगसोबत एक्सचेंज करुन या ऑफर्सचा फायदा मिळवता येणार आहे.

12 महिन्यांसाठी कार्ड वैध राहील!

जिओ फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड 12 महिन्यासाठी वैध राहील आणि या कार्डच्या मदतीने नवीन जिओ फोन घेतला जाईल. तसेच या ऑफर्सच्या व्यतिरिक्त जिओ फोन 501 रुपयांत एक्सचेंजवर मिळणार आहे. मात्र 1095 रुपयांची सहा महिन्यांची सर्व्हिस आपल्याला मिळणार नाही.