AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Plans : 200 रुपयाचा Jio प्लॅन चर्चेत, डेटा आणि कॉलिंग फ्री, वैधता किती? Airtel-Viला भारी? जाणून घ्या…

जिओच्या या प्लॅनची ​​किंमत जवळपास 200 रुपये आहे. यामध्ये 1 महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग दिले जाते. इतर कंपन्यांना अशी योजना जास्त किंमतीत मिळेल. जाणून घेऊया रिलायन्सच्या या प्लानची माहिती. 

Jio Plans : 200 रुपयाचा Jio प्लॅन चर्चेत, डेटा आणि कॉलिंग फ्री, वैधता किती? Airtel-Viला भारी? जाणून घ्या...
200 रुपयाचा Jio प्लॅन चर्चेतImage Credit source: social
| Updated on: Jul 18, 2022 | 9:55 AM
Share

मुंबई :  रिचार्ज म्हणजे एक प्रकारचा ईएमआयचं झालाय. तो प्रत्येक महिन्यात टाकावाच लागतो. रिचार्जचा खर्च देखील आता ठरलेला झालाय. यामुळे कमीत कमी किंमतीत रिचार्ज मारण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो. यातच आता रिलायन्स जिओचा (Jio Plans) एक स्वस्त प्लॅन बाकीच्या कंपन्यांवर प्रभाव टाकत आहे. जिओच्या या प्लॅनची ​​किंमत जवळपास 200 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 1 महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग दिले जाते. इतर कंपन्यांना अशी योजना जास्त किंमतीत मिळेल. चला जाणून घेऊया रिलायन्स जिओच्या या प्लानची माहिती. जिओचा हा प्लॅन (Plans) परवडणाऱ्या किमतीत सर्व सुविधा देतो. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो. यासह, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस (SMS) उपलब्ध आहेत. तुमच्या मनोरंजनासाठी प्लॅनमध्ये Jio अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.

एअरटेलचा 265 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा 265 रुपयांचा प्लॅन आहे. ज्यामध्ये अशा फीचर्स आहेत.हे Jio पेक्षा 56 रुपये जास्त आहे.प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1 GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 100 SMS प्रतिदिन मिळतात. याशिवाय मोफत HelloTunes आणि Wink Music वर मोफत प्रवेश दिला जातो.

Vi चा 265 रुपयांचा प्लान

त्याचप्रमाणे Vodafone Idea चा 269 रुपयांचा प्लान आहे. यामध्ये 1 जीबी डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएस 28 दिवसांसाठी दररोज उपलब्ध आहेत. यामध्ये Vi Movies & TV Basic चे सबस्क्रिप्शन दिले आहे.

Vodafone-Idea चे 129, 149, 155 आणि 199 रुपयांचे प्लान आहेत. 129 रुपयांच्या रिचार्जमध्ये 200MB एकरकमी डेटा उपलब्ध आहे. त्याची वैधता 18 दिवसांसाठी आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. मात्र, यामध्ये एसएमएस सुविधा उपलब्ध नाही. 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. त्याची वैधता 21 दिवस आहे. 155 रुपयांच्या या प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची असेल. या प्लॅनमध्ये 300 मोफत एसएमएस उपलब्ध आहेत.

एअरटेल रिचार्ज-

एअरटेल 155 च्या रिचार्जची वैधता 24 दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज 1GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस उपलब्ध आहेत. हा प्लॅन घेतल्यावर एक महिन्याचे प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन देखील मिळेल. 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा, 300 SMS, अनलिमिटेड कॉलिंग 30 दिवसांसाठी उपलब्ध आहे.

28 दिवसांची वैधता

जिओचा हा प्लॅन परवडणाऱ्या किमतीत सर्व सुविधा देतो.यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो. यासह, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. तुमच्या मनोरंजनासाठी प्लॅनमध्ये Jio अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.