इलॉन मस्कच्या X वर मिळणार नोकऱ्यांची माहिती, कंपनीने सुरु केले जॉब हायरींग फिचर

मायक्रोब्लॉगिंक साईट प्लॅटफॉर्म एक्सने ( पूर्वीचे ट्वीटर ) आता नोकऱ्यांची जाहीराती देण्यास सुरुवात करण्याची घोषणा केली आहे.

इलॉन मस्कच्या X वर मिळणार नोकऱ्यांची माहिती, कंपनीने सुरु केले जॉब हायरींग फिचर
Elon-Musk-X-Twitter
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 27, 2023 | 1:51 PM

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : सोशल मिडीआ प्लॅटफॉर्म एक्स X ने ( पूर्वीचे ट्वीटर ) हायरिंग बिटा व्हर्जन लॉंच करुन नवीन सर्व्हीस सुरु केली आहे. याद्वारे कंपन्या एक्सवर जॉब व्हॅकन्सीच्या जाहीराती टाकू शकणार आहेत. त्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळण्याबरोबरच कंपन्यांनाही योग्य कर्मचारी मिळण्यास मदत होणार आहे. एक्सच्या नव्या पावलाने लिंकडीनला  ( LinkedIn ) आव्हान मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच वेरीफाईट कन्टेंट क्रियटर्स पैसे कमविण्याची संधी देखील एक्सने दिली आहे.

वेरीफाइड ऑर्गनायझेशनला सुविधा 

या नव्या सुविधेचा फायदा वेरीफाइड ऑर्गनायझेशन उठवू शकणार आहेत. व्हेरीफाइड ऑर्गनायझेशन म्हणजे अशा कंपन्या ज्यांनी ट्वीटरच्या वेरिफाईड ऑर्गेनायझेशनचे सब्सक्रिप्शन घेतले आहे. या ऑर्गनायझेशन एक्स हायरिंग बिटा प्रोग्रॅमसाठी साईनअप करु शकतील. या प्रॉग्रॅमबद्दल @XHiring हॅंडलने एक्सवर पोस्ट केले आहे. एक्स हायरिंगने म्हटले आहे की एक्स हायरिंग बिटा जे केवळ वेरिफाईड ऑर्गेनायझेशनसाठी आहे. त्यांनी याचा वापर करण्यासाठी अनलॉक करावे. याच्या मदतीने ऑर्गेनायझेशन आपल्या येथील व्हॅकन्सीसाठी लाखो लोकांपर्यंत पोहचू शकतील.

वेरीफाईडसाठी ऑर्गनायझेशनला द्यावी लागते फी

आता कोणत्याही कंपनीला एक्सवर वेरीफाईड ऑर्गनायझेशनचा टॅग मिळविण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. यासाठी त्यांना 82,300 रुपये प्रति महिना फि भरावे लागते. ऑर्गेनायझनच्या पेड अकाऊंटच्या फायद्याचे बोलायचे तर कंपन्या आणि ऑर्गनायझशन आपल्या कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटला एफिलिएट आणि वेरीफाईड करू सकते. अशा प्रकारे वेरीफाईड झालेल्या अकाऊंट्सला टीक सोबतच ऑर्गेनायझेशनचा युनिक बॅज देखील मिळतो.

पैसे कमविण्याची संधी 

मायक्रोब्लॉगिंक साईट प्लॅटफॉर्म एक्सद्वारे वेरीफाईट कन्टेंट क्रियटर्स पैसे देखील कमावू शकणार आहेत. यासाठी कंपनीने जुलै महिन्यात एड रेवेन्यू शेअरींग प्रोग्रॅम लॉंच केला आहे. या प्रोग्रॅमनूसार क्रिएटर्सना त्यांच्या ट्वीटच्या रिप्लायमध्ये दाखवल्या जाणाऱ्या जाहीरातीसाठी पेमेंट दिले जाणार आहे. एक्स कंपनीचे मालक इलोक मस्क अलिकडेच सांगितले होते की कंपनी क्रीएटर्सना फर्स्ट ब्लॉकमध्ये एकूण 5 मिलियन डॉलर ( 41 कोटी रुपये ) पेमेंट करेल असे म्हटले होते.