AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवोचा नवा फोन लाँच, ब्लूटूथ ईअरफोन फ्री

नवी दिल्ली : मोबाईल इंडस्ट्रीमधील चिनी कंपनी असलेल्या विवोने मंगळवारी भारतात Vivo Y91 स्मार्टफोन लाँच केला. सध्या भारतात विवो, शाओमी आणि ओप्पो मोबाईल कंपनीने धुमाकूळ घातला आहे. अनेक नव-नवीन मोबाईल आज बाजारात लाँच होत आहेत. ग्राहकांना आकर्षण करण्यासाठी प्रत्येकजण काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आहे. यातच विवोने चक्क ब्लूटूथ ईअरफोन आपल्या मोबाईलसोबत फ्री देत […]

विवोचा नवा फोन लाँच, ब्लूटूथ ईअरफोन फ्री
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM
Share

नवी दिल्ली : मोबाईल इंडस्ट्रीमधील चिनी कंपनी असलेल्या विवोने मंगळवारी भारतात Vivo Y91 स्मार्टफोन लाँच केला. सध्या भारतात विवो, शाओमी आणि ओप्पो मोबाईल कंपनीने धुमाकूळ घातला आहे. अनेक नव-नवीन मोबाईल आज बाजारात लाँच होत आहेत. ग्राहकांना आकर्षण करण्यासाठी प्रत्येकजण काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आहे. यातच विवोने चक्क ब्लूटूथ ईअरफोन आपल्या मोबाईलसोबत फ्री देत आहे.

Vivo Y91 मध्ये 4,030 mAh ची बॅटरी, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 6.22 इंचाचा डिस्प्ले आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ड्यू ड्रॉप नॉर्च दिला आहे. Vivo Y91 ची किंमत 10,990 रुपये आहे. हा फोन Vivo इंडिया स्टोअरवरुन तुम्ही खरेदी करु शकता.

ब्लूटूथ ईअरफोन फ्री

Vivo Y91 स्मार्टफोनवर स्टार ब्लॅक आणि ओशन ब्ल्यू रंग मिळेल. विवो आपल्या फोनवर ब्लूटूथ ईअरफोन फ्री देत आहे. ज्याची किंमत 1,200 रुपये आहे. बजाज फायनान्स कार्डच्या माध्यमातून तुम्ही हा फोन इनस्टॉलमेंटने ही खरेदी करु शकता. Vivo Y91 स्मार्टफोन MediaTek Helio P22 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा आहे. तसेच हा अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 2 जीबीची रॅम्प आणि 32 जीबीचा इंटरनल स्टोअरेज आहे. MicroSD कार्डच्या मदतीने फोन स्टोअरेज 256 जीबी पर्यंत वाढवू शकता.

सेल्फीसाठी आठ मेगापिक्सलचा कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये 6.22 इचांचा Halo फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या टॉपला ड्यू ड्रॉप नॉर्च दिला आहे. Vivo Y91 च्या फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असून फोनच्या रिअर कॅमेरामध्ये ड्यूअल सेटअप दिला आहे.  फोनच्या मागे 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. ड्यूअल सिमवाल्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट आहे. दोन स्लॉट सिमसाठी आणि एक मायक्रो एसडी कार्डसाठी दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,030 बॅटरी आहे. तसेच अनलॉक टेक्नोलॉजीसोबत फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

Follow Us
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत