Internet Explorer निवृत्त, ‘या’ कारणांमुळे 26 वर्ष जुनं ब्राऊझर बंद करण्याचा निर्णय

| Updated on: May 21, 2021 | 3:19 PM

मायक्रोसॉफ्टने आपलं आयकॉनिक इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) ब्राउझर जून 2022 मध्ये बंद करण्याची घोषणा केली आहे.

Internet Explorer निवृत्त, या कारणांमुळे 26 वर्ष जुनं ब्राऊझर बंद करण्याचा निर्णय
इंटरनेटची निर्मिती कुठे होते आणि कशी होते? इंटरनेटचा मालक कोण आहे? जाणून घ्या याबाबत सर्वकाही
Follow us on

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टने आपलं आयकॉनिक इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) ब्राउझर जून 2022 मध्ये बंद करण्याची घोषणा केली आहे, कारण कंपनी सध्या इंटरनेट एक्सप्लोररच्या (IE) भविष्याबद्दल विचार करीत आहे. कंपनीने इंटरनेट एक्सप्लोरर 1995 मध्ये मायक्रोसॉफ्ट एजमध्ये विंडोज 10 वर लाँच केलं होतं. दरम्यान, कंपनीकडून मायक्रोसॉफ्ट 365 ऑनलाइन सर्व्हिसकडून IE सपोर्टच्या समाप्तिची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. (Microsoft is finally retiring Internet Explorer in June 2022)

कंपनीने बुधवारी एक निवेदन जारी केलं आहे, त्यात कंपनीने म्हटलं आहे की, मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge) या जबाबदारीसाठी अधिक सक्षम होण्याबरोबरच इंटरनेट एक्सप्लोरर 11 डेस्कटॉप अॅप्लिकेशन 15 जून, 2022 पासून बंद केलं जाणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर विंडोज 10 च्या काही व्हर्जन्समध्ये सपोर्ट करणार नाही. एकेकाळी इंटरनेट एक्सप्लोरर जगभरात सर्वात जास्त वापरलं जाणारं ब्राऊझर म्हणून ओळखलं जात होतं. 2003 मध्ये जागतिक स्तरावर इंटरनेट एक्सप्लोररची हिस्सेदार जवळपास 95 टक्के इतकी होती.

Microsoft Edge चा वापर सुरु करा

फायरफॉक्स (2004) आणि गुगल क्रोम (2008) लाँच झाल्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर मागे पडत गेलं. तसेच Android आणि iOS सारख्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याचा वापर (Using Share) कमी झाला आहे, कारण या सिस्टम इंटरनेट एक्सप्लोररला सपोर्ट करत नाही. दरम्यान, तुम्ही जर घरी इंटरनेट एक्सप्लोररचा वापरणारे ग्राहक असाल आणि तुम्हाला वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक आधुनिक ब्राउझिंग अनुभवाचा आनंद घ्यायचा असेल तर 15 जून 2022 पूर्वी मायक्रोसॉफ्ट एज वापरणं सुरु करा, असं मायक्रोसॉफ्टकडून सांगण्यात आलं आहे.

Microsoft च्या युजर्सच्या गरजेनुसार हालचाली

तुम्ही जर इंटरनेट एक्सप्लोरर वापरणारी संस्था असल्यास, आपल्याकडे बर्‍याच वर्षांपासून तयार केलेल्या इंटरनेट एक्सप्लोरर-आधारित वेबसाइट्स आणि अ‍ॅप्सचा मोठा संच असू शकतो. मायक्रोसॉफ्टला असे आढळले आहे की, उद्योजकांकडे सरासरी 1,678 लीगसी अॅप्स आहेत. वेब विकसकांसाठी मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे की, युजर्सच्या गरजेनुसार इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट समाप्त करण्यासाठी त्यांनी पद्धतशीर हालचालींची योजना आखली पाहिजे.

Microsoft Edge हे Internet Explorer पेक्षा उत्तम

कंपनीने म्हटले आहे की, मायक्रोसॉफ्ट एज हा इंटरनेट एक्स्प्लोररपेक्षा वेगवान, अधिक सुरक्षित आणि आधुनिक ब्राऊझिंगचा अनुभवच नाही तर जुन्या लीगेसी वेबसाइट आणि अ‍ॅप्सबद्दलची चिंता देखील दूर करण्यास सक्षम आहे. मायक्रोसॉफ्ट एजमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर मोड (आयई मोड) बिल्ट इन आहे, जो युजर्सना मायक्रोसॉफ्ट एजवरून थेट इंटरनेट एक्सप्लोरर आधारित वेबसाइट आणि अॅप्लिकेशन्सवर जाण्याची परवानगी देतो.

इतर बातम्या

मोबाईलमधल्या स्लो इंटरनेटमुळे वैतागलाय? मग ‘हे’ उपाय करुन पाहाच!

वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार

(Microsoft is finally retiring Internet Explorer in June 2022)