AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : मुलीच्या हट्टासाठी बापाने साकारली ‘मिनी रिक्षा’

तिरुअनंतरपुरम (केरळ)  : एकीकडे देशात मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. यामध्ये देशात मुलींच्या संख्येत घट झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. असं असताना केरळमधील एका बापाने आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यासाठी अशक्य अशी गोष्ट शक्य करुन त्याने आपल्या मुलीचा हट्ट पूर्ण केला आहे. या बापाने चक्क हुबेहूब दिसणारी मिनी ऑटो तयार केली […]

VIDEO : मुलीच्या हट्टासाठी बापाने साकारली ‘मिनी रिक्षा’
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

तिरुअनंतरपुरम (केरळ)  : एकीकडे देशात मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. यामध्ये देशात मुलींच्या संख्येत घट झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. असं असताना केरळमधील एका बापाने आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यासाठी अशक्य अशी गोष्ट शक्य करुन त्याने आपल्या मुलीचा हट्ट पूर्ण केला आहे. या बापाने चक्क हुबेहूब दिसणारी मिनी ऑटो तयार केली आहे. सामान्य ऑटोप्रमाणेच ही ऑटो आहे.

बाप आणि मुलीचे नातं हळवं असतं, आईपेक्षा मुलगी बापाच्या अधिक जवळ असते. ज्या केरळ राज्यात मुलींच्या संख्येत घट झाली त्याच केरळ राज्यात बापाने आपल्या मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी मिनी ऑटो तयार केली आहे. दक्षिणेकडील राज्यात स्त्रियांचं प्रमाण तसं समाधानकारक होतं, मात्र ते सुद्धा घसरल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे. केरळमध्ये हे प्रमाण जास्त होतं. पण आता केरळमध्येही महिलांची संख्या घटली आहे. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा मुलीवर जीवापाड प्रेम करणारा केरळमधील हा बाप मात्र आज हिरो ठरला आहे.

केरळमधील अरूण कुमार पुरूषोत्तम या बाप माणसाने तयार केलेली मिनी ऑटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सार्वजनिक वाहतुकीत सगळ्यात जास्त वाटा घेते ती म्हणजे रिक्षा, हीच हुबेहूब दिसणारी रिक्षा आपल्या लाडक्या लेकीसाठी बापाने बनवली असून सोशल माध्यमामध्ये ती सगळ्यांच्याच पसंतीत पडत आहे.

व्हिडीओ :

अरूणकुमार याने रिक्षा बनवण्याची प्रेरणा 1990 मधील रोमँटिक म्युजिकल चित्रपट ‘ए ऑटो’ पासून मिळाली. अरूण यांच्या मुलांची इच्छा होती ती त्याच्याजवळही एक तशीच ऑटोरिक्षा असावी. तुटपुंज्या पगारावर शासकीय रूग्णालयात काम करणाऱ्या अरूणकुमारकडे मोठी रिक्षा घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नव्हती, मात्र इच्छाशक्ती प्रबळ असल्याने अवघ्या साडेसात महिन्याच्या कालावधीत अरूणकुमारने ही मिनी ऑटो बनवली. लहानपणापासून अरूणकुमारला काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती त्याचा परिणाम म्हणून ही मिनी ऑटो त्याने प्रत्यक्षात उतरवली.

हे वाचा : हजार पुरुषांमागे 800 स्त्रिया, जन्मदराची धक्कादायक आकडेवारी

ही मिनी ऑटो पहाल तर मोठ्या ऑटोमध्ये ज्यारितीने बसण्याची जागा, ड्रायव्हरची सीट, हॉर्न, आरसे देखील हुबेहुब आहे इतकंच काय, तर ही ऑटो फक्त बनवली नसून डीसी मोटारच्या सहाय्याने ती मोठ्या ऑटो रिक्षाप्रमाणे धावते सुद्धा, मोठ्या ऑटोरिक्षात जे फंक्शन असतात ते फंक्शन या मिनी ऑटोमध्येही आपल्याला पाहायला मिळतात. या रिक्षाचं नाव सुंदरी ठेवण्यात आले आहे. या सुंदरीत मोबाईल चार्जरची सुविधाही देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळीही हेडलाईटच्या प्रकाशात ही रिक्षा अरूणकुमार यांची मुले चालवत असतात.

केरळमधील बापाचे आपल्या मुलीवरचं प्रमे पाहून सध्या देशभरातून लोक सोशलमीडियावर त्याची प्रशंसा करत आहेत. प्रत्येकाने जर मुलींबद्द असे प्रेम दाखववले तर नक्कीच देशातील दिवसेंदिवस घटत असलेली मुलींची संख्या कमी होऊ शकते.

शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.