AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन घ्यायचा विचार करताय? हा फोन तब्बल 10 हजारांनी स्वस्त!

जर तुम्ही Motorola चा 108MP कॅमरा असलेला स्मार्टफोन Motorola Edge+ विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी एक चांगली संधी आहे.

फोन घ्यायचा विचार करताय? हा फोन तब्बल 10 हजारांनी स्वस्त!
Motorola Edge+
| Updated on: Feb 27, 2021 | 3:00 PM
Share

मुंबई : जर तुम्ही Motorola चा 108MP कॅमरा असलेला स्मार्टफोन Motorola Edge+ विकत घेण्याचा (Motorola Edge Plus Smartphone Price Cut Of) विचार करत असाल तर त्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण या स्मार्टफोनची किंमत तब्बल 10,000 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे तुम्ही या स्मार्टफोनला कमी किमतीत खरेदी करु शकता (Motorola Edge Plus Smartphone Price Cut Of).

Motorola Edge+ ला भारतात गेल्या वर्षी मे महिन्यात लॉन्च करण्यात आली आणि या स्मार्टफोनची मुख्य विशेषता म्हणजे याचा कॅमेरा शानदार फोटोग्राफीचा एक्सपीरियंस देतो. पण, कंपनीने याच्या किंमतीमधील घसरणचा खुलासा केला नाही. पण, ही नवी किंमत ई-कॉमर्स साईट Flipkart वर लिस्ट झाली आहे.

Motorola Edge+ मध्ये काय खास

Motorola Edge+ ला गेल्या वर्षी भारतात 74,999 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आलं आहे. पण, आता हा स्मार्टफोन 10,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. युझर्स याला फक्त 64,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही नवी किंमत ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर उपलब्ध आहे. त्याशिवाय, जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा उपयोग कराल तर तुम्हाला आणखी 10 टक्क्यांची सूट मिळेल. सोबतच या स्मार्टफोनला नो कॉस्ट ईएमआय या पर्यायाद्वारेही खरेदी केलं जाऊ शकतं (Motorola Edge Plus Smartphone Price Cut Of).

108MP कॅमेरा

Motorola Edge+ कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 108MP चा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याशिवाय, फोनमध्ये 16MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि दोन कॅमेरे 8MP आणि 2MP चे आहेत. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 25MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ती 18W TurboPower वायर्ड चार्जिंग सपोर्ट, 18W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि 5W वायरलेस रिव्हर्स पावर शेयरिंग सपोर्टसोबत येते.

Motorola Edge+ मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसोबत 6.7 इंचाचा फुल्ल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 10 ओएसवर आधारित आहे आणि यामध्ये Qualcomm Snapdragon 865 चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 256GB ची इन्टरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत एक्सपान्ड केलं जाऊ शकतं.

Motorola Edge Plus Smartphone Price Cut Of

संबंधित बातम्या :

New Jio phone 2021 offer : केवळ 1999 रुपयात जिओ फोन, 2 वर्ष अनलिमिटेड कॉलिंग

या टॉप -5 यूपीआय अॅप्समधून करा पैसे ट्रान्सफर, देशात कुठेही पाठवू शकता पैसे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.