3 महिन्यांसाठी Jio Hotstar पहा टीव्हीवर, केवळ इतक्या कमी किंमतीत मिळणार सब्सक्रिप्शन

तुम्हाला जर Jio Hotstar टीव्हीवर पहायचे असेल तर तुमचे काम 100 रुपयांमध्ये कसे होईल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुकेश अंबानी यांनी एक उत्तम योजना आणली आहे जी प्रीपेड वापरकर्त्यांना कमी किमतीत 3 महिन्यांसाठी मोफत जिओ हॉटस्टार अॅक्सेस देते.

3 महिन्यांसाठी Jio Hotstar पहा टीव्हीवर, केवळ इतक्या कमी किंमतीत मिळणार सब्सक्रिप्शन
Jio Cinema
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Mar 15, 2025 | 4:09 PM

भारतात आघाडीवर असलेली टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ त्यांच्या युजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आला आहे. हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किंमतीत ऑफर केला जात आहे. या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये मोफत जिओ हॉटस्टारचा लाभ घेता येणार आहे. या जिओ प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे 100बकेल्यानंतर, तुम्ही फक्त मोबाईलवरच नाही तर टीव्हीवरही जिओ हॉटस्टारचा आनंद घेऊ शकाल. तसेच या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तर जिओ हॉटस्टार व्यतिरिक्त या नवीन प्लॅनमध्ये इतर कोणते फायदे मिळतात ते आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.

Jio 100 Plan

रिलायन्स जिओने त्यांच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक नवीन डेटा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. याची किंमत केवळ 100 रुपये आहे. रिलायन्स जिओचा हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Jio.com वर तसेच कंपनीच्या My Jio App वर हा प्लॅन लिस्ट करण्यात आलेला आहे. या नवीन प्लॅनसह केवळ जिओ हॉटस्टारच नाही तर प्रीपेड वापरकर्त्यांना कंपनीकडून 5 जीबी हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळणार आहे. परंतु लक्षात ठेवा की डेटा संपल्यानंतर यांची स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.

येथे वापरकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा डेटा प्लॅन फक्त तेव्हाच काम करेल जेव्हा तुमच्या जिओ नंबरवर बेस प्लॅन आधीच सक्रिय असेल. या प्लॅनमध्ये युजर्सना 90 दिवसांसाठी JioHotstar चे एड-सपोर्टेड कंटेंटचे सबस्क्रिप्शन मिळेल. तथापि, या प्लॅनमध्ये फक्त डेटा बेनिफिट्स आहेत आणि व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा नाही.

कंपनीच्या अधिकृत साइटवर या प्लॅनसोबत दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही जिओ मंथली प्लॅन वापरत असाल तर तुम्हाला बेस प्लॅन एक्सपायर होण्याच्या 48 तास आधी बेस प्लॅन रिचार्ज करावा लागेल. जर तुम्ही असे केले तरच तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यातही जिओ हॉटस्टारचे फायदे मिळतील.

Jio 100 Plan Validity

100 रुपयांच्या या रिर्चाज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना तब्बल 90 दिवसांसाठी jioHotstar सबस्क्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. या प्लॅनशी स्पर्धा करण्यासाठी, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कडे असा कोणताही स्वस्त प्लॅन नाही जो फक्त 100 रुपयांमध्ये 90 दिवसांच्या वैधतेसह जिओ हॉटस्टारचा लाभ देऊ शकतो.

एअरटेलकडे सर्वात स्वस्त जिओ हॉटस्टार प्लॅन 160 रुपयांचा आहे जो 7 दिवसांच्या वैधतेसह येतो. पण इथे रिलायन्स कडुन 160 रुपयांमध्ये, तुम्हाला जिओ हॉटस्टारसह ३ महिन्यांसाठी ५ जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळत आहे.

Viबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी 151 रुपयांमध्ये 30 दिवसांची वैधता असलेला 4 जीबी हाय स्पीड डेटा आणि तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टारचा मोफत वापर देते.