Neuralink Brain Chip | एलॉन मस्क याचे विज्ञानाला आव्हान; मानवी मेंदूत बसवली चिप, काय करेल काम

Neuralink Brain Chip | Elon Musk यांची कंपनी Neuralink ने पहिल्यांदा मानवी मेंदूत चिप फिट केली आहे. अर्थातच या अनोख्या प्रयोगाची जगभर चर्चा रंगली आहे. एलॉन मस्क याने यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. पण हे तंत्रज्ञान आहे तरी काय, करते तरी काय काम? कशासाठी होणार वापर?

Neuralink Brain Chip | एलॉन मस्क याचे विज्ञानाला आव्हान; मानवी मेंदूत बसवली चिप, काय करेल काम
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 2:00 PM

नवी दिल्ली | 30 January 2024 : कृत्रिम बुद्धमता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(AI) नंतर आता विज्ञानाने पुढील झेप घेतली आहे. जगातील अब्जाधीश एलॉन मस्क याच्या कंपनीने हॉलिवूड चित्रपटात पाहतो, तसे फिक्शन केले आहे. त्याने मानवी मेंदूत चिप बसवली आहे. या अनोख्या प्रयोगाची सध्या जगभर चर्चा रंगली आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर, मालक मस्क याने एक पोस्ट शेअर केली आहे. विज्ञानाला आव्हान देणाऱ्या या प्रयोगाकडे जगाचे लक्ष लागले आहे. थेट निसर्गाला आव्हान देणारा हा प्रकल्प आहे तरी काय..

  1. नेमका प्रकल्प आहे तरी काय – कंपनीच्या दाव्यानुसार, ही चिप तुमच्या मेंदूतील विचार वाचू शकते. ज्या व्यक्तीच्या मेंदूत ही चिप बसविण्यात आली. त्याने एक अक्षर जरी उच्चारले नाही तरी, तो मशिनींसोबत संवाद साधू शकतो. सध्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते स्मार्टफोन आणि संगणक नियंत्रीत करत आहेत. ही चिप मेंदूत बसविण्यापूर्वी तिची चाचणी करण्यात येते. त्यानंतरच ती बसविण्यात येते, असे मस्कने स्पष्ट केले आहे.
  2. काय म्हणाला एलॉन मस्क – एलॉन मस्क याने एक्सवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, न्यूरोटेक्नोलॉजी कंपनी Neuralink ने पहिल्यांदा मानवी मेंदूत ‘ब्रेन चिप’ बसवली आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यात ही चिप बसवली आहे. तो ठीक होत आहे. या प्रयोगाचे सुरुवातीचे निकाल, परिणाम आशादायक आहेत. याप्रयोगानुसार, मानवी मेंदूत जी चिप बसविण्यात आली आहे. ती 5 रुपयांच्या शिक्क्याइतकी आहे.
  3. ही तर Telepathy – एलॉन मस्क याने न्यूरालिंक प्रकल्पाच्या या भन्नाट प्रयोगाला Telepathy हे नाव दिले आहे. 2016 मध्ये मस्क याने हे स्टार्टअप सुरु केले होते. गेल्या वर्षी युएस फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने त्याला मंजूरी दिली होती. त्यानंतर लागलीच या प्रयोगाची चाचणी करण्यासाठी या स्टार्टअप्सने भरती प्रक्रिया सुरु केली. त्यात काही जणांची प्रयोगासाठी निवड करण्यात आली.
  4. कोणासाठी ठरेल उपयोगी – हे तंत्रज्ञान दृषिहीन-अंध व्यक्तींसाठी वरदान ठरेल. अंपगत्व आलेल्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल. स्मृतीभंश झालेल्या रुग्णांसाठी ही जादूची शक्ती असेल. तसेच मेंदूविकाराशी सामना करणाऱ्या रुग्णांच्या जीवनात यामुळे आशेचा एक किरण उगवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. हे तंत्रज्ञान करते तरी कसे काम – एलॉन मस्क याने पोस्टमध्ये याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, मेंदूत बसवलेली चिप कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईशी जोडता येते. हे इम्प्लांट शारिरीकदृष्ट्या कमकूवत लोकांसाठी उपयुक्त ठरु शकते. या कंपनीचे उद्दिष्ट मानवी मेंदू आणि संगणक यांना थेट जोडणे असा आहे.
Non Stop LIVE Update
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.