AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किफायतशीर किंमतीत प्रीमियम लूक, ढासू डिझाईन, जबरदस्त फीचर्ससह नवीन स्मार्टवॉच बाजारात

वेअरेबल कंपनी नॉईजने (Noise) बाजारात आणखी एक स्मार्टवॉच लाँच केलं आहे. आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत, Noise ने बाजारात नवीन कोर स्मार्टवॉच लाँच केलं आहे.

किफायतशीर किंमतीत प्रीमियम लूक, ढासू डिझाईन, जबरदस्त फीचर्ससह नवीन स्मार्टवॉच बाजारात
NoiseFit Core smartwatch
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 3:46 PM
Share

मुंबई : वेअरेबल कंपनी नॉईजने (Noise) बाजारात आणखी एक स्मार्टवॉच लाँच केलं आहे. आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत, Noise ने बाजारात नवीन कोर स्मार्टवॉच लाँच केलं आहे. स्मार्टवॉच हार्ट रेट मॉनिटर, विविध स्पोर्ट्स मोड आणि इतर फिचर्ससह सज्ज आहे. नॉईज कोर स्मार्टवॉचला गोल डायल आणि मेटल फिनिश मिळते. नॉईजने काही आठवड्यांपूर्वी कोर स्मार्टवॉच लाँच केले होते, त्या दरम्यान कंपनीने नॉईज अॅक्टिव्ह स्मार्टवॉच आणि नॉईज अल्ट्रा स्मार्टवॉच अधिकृत केले. (NoiseFit Core smartwatch launched in India, know Price, features)

स्मार्टवॉचबद्दल बोलताना, नॉईजचे सह-संस्थापक गौरव खत्री यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या कंपनीचा प्रत्येक कर्मचारी ग्राहकांच्या मागणीशी जुळण्यासाठी ग्राहकांना दर्जेदार उत्पादन देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही स्मार्टवॉच रीडिफाइन करण्याचा प्रयत्न करत आहोत. या स्मार्टवॉचद्वारे, आम्ही आमच्या ग्राहकांना स्मार्ट वेअरेबल अनुभव देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

किंमत आणि उपलब्धता

Noisefit Core भारतात 2999 रुपये इतक्या किंमतीत लॉन्च करण्यात आले आहे. नॉईजच्या अधिकृत वेबसाइटवरून स्मार्टवॉच खरेदी करता येईल. हे वॉच दोन रंग पर्यायांमध्ये लाँच केले गेले आहे ज्यात ब्लॅक आणि सिल्व्हर या दोन रंगांचा समावेश आहे. कंपनी हे स्मार्टवॉच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकेल की नाही याविषयी नॉईजने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

स्मार्टवॉचमधील फीचर्स

नॉईज कोर स्मार्टवॉचमध्ये 1.28 इंचाचा TFT डिस्प्ले 240 × 240 पिक्सेल रिझोल्यूशनसह आहे. स्मार्टवॉचमध्ये जिक अलॉय मेटल बॉडीचा वापर करण्यात आला आहे जी सिंगल क्राउन बटणासह येते. लूक नुसार, तुम्हाला या घड्याळात पातळ बेजल्स मिळतील. हे स्मार्टवॉच हेल्थ सेन्सर, जसे की हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटरिंग आणि 13 स्पोर्ट्स मोड्ससह सुसज्ज आहे. स्वेट आणि वॉटर रेजिस्टन्सच्या बाबतीत या स्मार्टवॉचला IP68 रेटिंग देण्यात आलं आहे.

बॅटरीच्या बाबतीत, घड्याळात 285mAh ची बॅटरी आहे. कंपनीने म्हटले आहे की घड्याळ सिंगल चार्जवर 7 दिवस टिकेल इतका बॅटरी बॅकअप देते तर ते स्टँडबायवर 30 दिवस टिकू शकते. स्मार्टवॉच Android 7 डिव्हाइस किंवा iOS 9.0 सह जोडले जाऊ शकते. Noisefit Core द्वारे म्युझिक हाताळता येईल. युजर्स या स्मार्टवॉचमध्ये वॉच फेसेस कस्टमाइज करु शकतात.

इतर बातम्या

कमी किंमत आणि 6000mAh बॅटरीसह Redmi 10 Prime भारतात लाँच

Samsung Galaxy M32 5G बाजारात, आजपासून सेल सुरु, जाणून घ्या किती आहे 5G फोनची किंमत

वर्षअखेरीस Samsung सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

(NoiseFit Core smartwatch launched in India, know Price, features)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.