आता व्हॉट्सअॅपला ‘डेल्टा चॅट’चा पर्याय, जाणून घ्या काय आहे डेल्टा चॅट?

| Updated on: Feb 14, 2021 | 1:17 PM

आता व्हॉट्सअॅपला 'डेल्टा चॅट'चा पर्याय, जाणून घ्या काय आहे डेल्टा चॅट? (Now WhatsApp has the option of Delta Chat)

आता व्हॉट्सअॅपला डेल्टा चॅटचा पर्याय, जाणून घ्या काय आहे डेल्टा चॅट?
आता व्हॉट्सअॅपला डेल्टा चॅटचा पर्याय
Follow us on

मुंबई : नवी प्रायव्हसी पॉलिसी व्हॉट्सअॅपसाठी फार नुकसानदायी ठरली आहे. या पॉलिसीमुळे बरेच व्हॉट्सअॅपचे युजर्स सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या अ‍ॅप्सकडे वळले आहेत. मात्र खरंच सिग्नल आणि टेलिग्राम सुरक्षित आहे का? वाढते युजर्स पाहता भविष्यात हे दोन्ही अॅप्स आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही या अॅपव्यतिरिक्त अन्य पर्यायाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला ‘डेल्टा चॅट’बाबत माहिती देणार आहोत. डेल्टा चॅट सर्व अॅप्सपेक्षा अधिक सुरक्षित मानले जातेय. (Now WhatsApp has the option of Delta Chat)

काय आहे डेल्टा चॅट?

डेल्टा चॅटचे इंटरफेस व्हॉट्सअॅप, सिग्नल आणि टेलिग्राम प्रमाणे आहे. हे एक ओपन सोर्स प्रोग्राम असल्याने यात बग्सही आहेत. हे अॅप तुम्ही अँड्रॉईड, iOS, Linux, macOS आणि विडोजमधून डाऊनलोड करु शकता. डेल्टा चॅटची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे अॅप तुमच्या ई-मेलचा वापर करीत असल्याने तुम्हाला तुमची खाजगी माहिती देण्याची आवश्यकता नाही.

डेल्टा वापरासाठी फोन नंबरची गरज नाही

वॉट्सअॅप, सिग्नल आणि टेलिग्राम हे सर्व अॅप्स तुमच्या फोन नंबरचा वापर करतात. फोन नंबरमुळेच तुमची प्रायव्हसी असुरक्षित होते. कारण फोन नंबरशी तुमचे बँक अकाऊंट, तुमचा पत्ता आणि तुमची खाजगी माहिती जोडलेली असते. तसेच यात तुमचे कॉन्टॅक्टही असतात. यामुळेच तुमच्या फोन नंबरच्या मदतीने तुम्हाला जाहिराती आणि इतर सूचना मिळतात जे धोकादायक आहे. मात्र डेल्टा चॅटमध्ये तुम्हाला फोन नंबरची आणि कोणतेही कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर लोकांशी संवाद साधण्यासाठी केवळ ई-मेल आयडी माहित असणे गरजेचे आहे.

सर्व्हर डाऊन झाल्यास

डेल्टा चॅटमध्ये एका युजरचे सर्व्हर डाऊन झाल्यास त्या सर्व्हरशी जोडलेल्या सर्व लोकांवर याचा परिणाम होतो. जानेवारीमध्ये अशाच प्रकारे सर्व्हर डाऊन झाले होते तेव्हा कुणालाही या प्लॅटफॉर्मचा वापर करता आला नव्हता, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या सर्व्हरचा वापर करणे फायदेशीर ठरते. जर सर्व्हर सतत डाऊन होत असेल तर तुम्ही दुसऱ्या सर्व्हरवर स्विच करु शकता.

तुमचा डाटा तुम्ही कंट्रोल करु शकता

डेल्टा अॅपचा आणखी एक फायदा हा आहे की, तुम्ही डाटा स्वतः कंट्रोल करु शकता, इतर कुणीही हा निर्णय घेऊ शकत नाही. तसेच सरकार या अॅपला ब्लॉक करु शकत नाही. यासाठी तुम्हाला केवळ सर्व्हर होस्टनेम आणि आयपी अॅड्रेस तुमच्या कनेक्शनमधून काढून टाकावे लागेल. या अॅपवर तुम्ही तीन अकाऊंट बनवू शकता. (Now WhatsApp has the option of Delta Chat)

 

 

इतर बातम्या

‘रिअल मी’चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार

तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर लक्ष द्या, 1 मार्चपासून बँकेत होणार आहे मोठा बदल