AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus Smartphone : OnePlus 10R 5Gची किंमत 4 हजारांनी झाली स्वस्त, ‘या’ किंमतीत मिळणार नवा फोन

OnePlus Smartphone खरेदी करायचा विचार असेल तर OnePlus 10R 5G स्मार्टफोनची किंमत 4 हजार रुपयांनी स्वस्त झाला. आहे. त्यामुळे OnePlusच्या या नव्या स्मार्टफोनची किंमत आता 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत असेल.

OnePlus Smartphone : OnePlus 10R 5Gची किंमत 4 हजारांनी झाली स्वस्त, 'या' किंमतीत मिळणार नवा फोन
OnePlus Nord CE 2 Lite 5G च्या किमतीत कपात; मिळणार 1000 रुपयांची सूट, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी !Image Credit source: OnePlus
| Updated on: Aug 05, 2022 | 4:49 PM
Share

OnePlus 10R Price in India : जर तुम्हालाही वनप्लस (Oneplus) ब्रँडचे फ्लॅगशिप फीचर्स वाले स्मार्टफोन आवडत असतील. आणि या वर्षी लॉन्च करण्यात आलेला वनप्लस 10R (OnePlus 10R 5G) स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असेल, तर एक चांगली संधी आहे. वनप्लस 10R या स्मार्टफोनच्या किंमतीत 4 हजार रुपयांची घट झाली असून या फोनच्या तिन्ही व्हेरिएंट्सची (Variant) किंमत कमी झाली आहे. त्यामुळे आता उत्तम फोन त्याच फीचर्ससह, पण कमी किमतीत मिळणार आहे. OnePlus 10R 5G हा फोन जेव्हा लॉन्च करण्यात आला त्यावेळेस 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंट (80 वॉट)चा फोन 38,999 रुपयांना तर 12 जीबी रॅम व 256 जीबी (80 वॉट) व्हेरिएंटसाठी 42,999 रुपये किंमत होती. तर 12 जीबी रॅम (RAM) आणि 256 जीबी मॉडेल (150 वॉट) 43,999 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता तिन्ही मॉडेल्सच्या किंमतीत 4 हजार रुपयांची घट झाल्याने 8 जीबीचे मॉडेल 34,999 रुपये, 256 जीबी (80 वॉट) चे मॉडेल 38,999 रुपये आणि 256 जीबी (150 वॉट)चे मॉडेल 39,999 रुपयांत खरेदी करू शकता.

दोन कलर व्हेरिएंट्स

वनप्लस 10R स्मार्टफोनचे दोन कलर व्हेरिएंट्स आहेत, त्यापैकी एक ब्लॅक आणि दुसरा आहे फॉरेस्ट ग्रीन. फोनसोबत मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनसाठी आयसीआयसीआय बँकेच्या कार्डावर 1000 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी 6 महिन्यांपर्यंत बिनव्याजी ईएमआयची सुविधाही उपलब्ध आहे. जुना फोन एक्स्चेंज करून नवा फोन घ्यायचा असेल तर 3 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल.

OnePlus 10R 5Gचे स्पेसिफिकेशन –

प्रोसेसर : या वनप्लस फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 8100 मॅक्स ऑक्टा-कोअर चिपसेट आहे.

डिस्प्ले : 120 हर्ट्ज डायनामिक रिफ्रेश रेट सह 6.7 इंचांचा फुल-एचडी प्लस (1080×2412 पिक्सेल) डिस्प्ले असून 720 हर्ट्सपर्यंत टच रिस्पॉन्स रेट ऑफर करण्यात आला आहे.

बॅटरी : वनप्लस 10R 5Gचे Endurance मॉडेल तुम्हाला 150 वॉट सुपरवूक फास्ट चार्ज आणि 4500 एमएएचच्या बॅटरीसह मिळेल. तसेच, 80 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट असलेले मॉडेल 5000 एमएएच च्या बॅटरीसह आहे.

कॅमेरा सेटअप : फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. 50 मेगापिक्सल Sony IMX766 प्रायमरी सेन्सर, त्यासह 8 मेगापिक्सेल Sony IMX355 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सल GC02M1 मॅक्रो सेन्सर या फोनमध्ये मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल Samsung ISOCELL S5K3P9 कॅमेरा फोनच्या पुढल्या भागात उपलब्ध आहे.

इतर वैशिष्ट्ये : या फोनमध्ये ग्राहकांना नॉइस कॅन्सलेशन फीचर, ड्युएल स्टिरिओ स्पीकर्स आणि सुरक्षिततेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा देण्यात आली आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.