आयफोन 17 पेक्षा स्वस्तात पॉवरफूल प्रोसेसरसह लाँच झाला oneplus 15 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

OnePlus चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. कंपनीने हा हँडसेट सर्वात वेगवान आणि सर्वात पॉवरफुल प्रोसेसरसह लाँच केला आहे, जो केवळ एक पॉवरफुल प्रोसेसरच नाही तर इतर अनेक प्रभावी फिचर्स देखील आहेत. चला जाणून घेऊया या फोनची किंमत किती असेल?

आयफोन 17 पेक्षा स्वस्तात पॉवरफूल प्रोसेसरसह लाँच झाला oneplus 15 स्मार्टफोन,  जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
OnePlus 15
| Edited By: | Updated on: Nov 15, 2025 | 4:43 PM

वनप्लस कंपनीने त्यांचा OnePlus 15 हा स्मार्टफोन चीनी बाजारात लाँच केल्यानंतर आता भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी प्रीमियम फिचर्ससह समृद्ध असलेला हा फ्लॅगशिप फोन लाँच केला आहे. या हँडसेटमध्ये क्वालकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेसर, 165Hz रिफ्रेश रेट, पॉवरफुल 7300mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा यासह अनेक प्रभावी फिचर्स आहेत.

OnePlus कंपनीने जाहीर केले आहे की बहुतेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर आढळणाऱ्या IP68 रेटिंग व्यतिरिक्त, OnePlus 15 ला IP69K रेटिंग देखील आहे. IP69K रेटिंगचा अर्थ असा आहे की फोन कोणत्याही दिशेने येणाऱ्या थंड आणि गरम पाण्याच्या उच्च-दाबाच्या जेट्सना तोंड देऊ शकतो. तो 30 मिनिटांपर्यंत 2 मीटर पर्यंत पाण्यात पूर्णपणे राहू शकतो.

या फोनमध्ये प्लस माइंड, एआय रेकॉर्डर, गुगल जेमिनी एआय, एआय स्कॅन आणि एआय प्लेलॅब सारख्या अनेक एआय फीचर्स आहेत. चला जाणून घेऊया या फोनचे किती व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आले आहे. तसेच या व्हेरिएंटची किंमत काय आहे, सेल कधी सुरू होईल आणि या फोनमध्ये कोणते खास फीचर्स उपलब्ध आहेत?

OnePlus 15 ची भारतात किंमत

OnePlus 15 हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे: 12GB RAM/256GB व्हेरिएंटची किंमत 72,999 रूपये आहे आणि 16GB RAM/512GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 79,999 रूपये आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त 13 नोव्हेंबर रात्री 8 वाजता Amazon वर विक्री सुरू होईल. जर तुम्ही HDFC बँक कार्डने फोन खरेदी केला तर डिस्काउंटनंतर 256GB व्हेरिएंटचा असलेला हा फोन 68,999 रूपयांना खरेदी करता येईल आणि 512GB व्हेरिएंटचा फोन तुम्ही 75,999 खरेदी करू शकता.

वनप्लस 15 चे पर्याय

स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाले तर या किंमतीच्या रेंजमध्ये हा फोन आयफोन 17 (किंमत 82,999), गुगल पिक्सेल 10 (किंमत 79,999) आणि सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6 5जी (किंमत 77,990) सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. वनप्लस 15चा 256 जीबी व्हेरिएंट आयफोन 17 च्या 256 जीबी व्हेरिएंटपेक्षा 10,000 रुपयांनी स्वस्त आहे.

वनप्लस 15 स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि ऑपरेटिंग सिस्टम: OxygenOS 16 वर चालणाऱ्या या फोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा क्वाड HD+ AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 1800 nits पीक ब्राइटनेस, 3200Hz टच सॅम्पलिंग रेट आणि सन डिस्प्ले तंत्रज्ञान देखील आहे, जे थेट सूर्यप्रकाशातही तुम्हाला फोनच्या स्क्रिनवर सहज पाहता येईल.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 प्रोसेसर वापरण्यात आला आहे, तसेच चांगल्या ग्राफिक्ससाठी एड्रेनो 840 जीपीयू देण्यात आला आहे.

कॅमेरा: या वनप्लस फोनमध्ये डिटेलमॅक्स इंजिनसह ट्रिपल 50-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे. मागील बाजूस 50-मेगापिक्सेल सोनी IMX906 प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सेल सॅमसंग JN5 टेलिफोटो सेन्सर आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. समोर, सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल सोनी IMX709 सेन्सर आहे.

बॅटरी: फोनला 7300mAh ची पॉवरफूल बॅटरी आहे जी 120W SuperVOOC वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस एअरचार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की फोन फक्त 39 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत पूर्णपणे चार्ज होऊ शकतो.