वनप्लस 15R ने दमदार फीचर्ससह नवीन 16GB रॅम व्हेरिएंट केला लाँच, ‘ही’ आहे किंमत

गेल्या वर्षी जेव्हा वनप्लस 15R फोन लाँच झाला होता, तेव्हा या हँडसेटचे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले होते, पण आता कंपनीने ग्राहकांसाठी 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असलेला एक नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. चला तर मग हा फोन कोणत्या किमतीत लाँच केला आहे ते जाणून घेऊयात.

वनप्लस 15R ने दमदार फीचर्ससह नवीन 16GB रॅम व्हेरिएंट केला लाँच, ही आहे किंमत
| Edited By: | Updated on: Jun 19, 2026 | 3:48 PM

वनप्लस 15R हा स्मार्टफोन 2025 मध्ये दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला होता. ज्याच्या टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज होते. आता कंपनीने या फ्लॅगशिप फोनचा एक नवीन 16GB रॅम व्हेरिएंट लाँच केला आहे. हे 16GB मॉडेल 512GB स्टोरेजसह उपलब्ध असणार आहे. तसेच या नवीन मॉडेलच्या फिचर्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीयेत. आधीच्या मॉडेलप्रमाणेच या फोनचे फिचर्स सारखेच आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत जाणून‍ घेऊयात.

वनप्लस 15R 16GB ची किंमत

या वनप्लस स्मार्टफोनचा 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 61 हजार 999 मध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 54 हजार 999 रूपये आहे, तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 59 हजार 999 रूपयांमध्ये विकला जात आहे. निवडक बँक कार्ड्स (HDFC, कोटक आणि IDFC कार्ड्स) वापरून या फोनवर 3,000 ची सूट देखील मिळत आहे.

वनप्लस 15R स्पर्धा

हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर तसेच ॲमेझॉनवर मिंट ब्रीझ, चारकोल ब्लॅक आणि इलेक्ट्रिक व्हायोलेट रंगांमध्ये उपलब्ध आहे. या किमतीत हा वनप्लस फोन शाओमी 14 सिवी, ओप्पो रेनो13 प्रो 5G आणि सॅमसंग गॅलेक्सी S25 FE 5G सारख्या स्मार्टफोन्सशी जोरदार स्पर्धा करतो.

वनप्लस 15R ची फिचर्स

डिस्प्ले: या डिव्हाइसमध्ये 165Hz रिफ्रेश रेट असलेला 6.8-इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 1800 nits पर्यंतच्या ब्राइटनेससह येतो.

चिपसेट: या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर वापरण्यात आला आहे, हा चिपसेट उच्च-स्तरीय कामगिरीसाठी ओळखला जातो.

कॅमेरा: हा फोन 120fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. यात 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. प्रगत वैशिष्ट्यांमध्ये क्लियर बर्स्ट, अल्ट्रा क्लियर मोड आणि क्लियर नाईट इंजिन यांचा समावेश आहे.

बॅटरी: यामध्ये 7400mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी 80W सुपरVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

 

Follow Us