AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus चा ‘हा’ ढासू स्मार्टफोन आता नव्या रंगात, 9 सिरीजअंतर्गत नवं मॉडेल

वनप्लसने (OnePlus) यावर्षी वनप्लस 9 प्रो फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 9 आर आणि 9R प्रो मॉडेलसह लाँच केला होता. हे डिव्हाईस तीन रंगांमध्ये सादर करण्यात आलं होतं.

OnePlus चा 'हा' ढासू स्मार्टफोन आता नव्या रंगात, 9 सिरीजअंतर्गत नवं मॉडेल
oneplus
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 4:33 PM
Share

मुंबई : वनप्लसने (OnePlus) यावर्षी वनप्लस 9 प्रो फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 9 आर आणि 9R प्रो मॉडेलसह लाँच केला होता. हे डिव्हाईस तीन रंगांमध्ये सादर करण्यात आलं होतं, ज्यात मॉर्निंग मिस्ट, पाइन ग्रीन आणि स्टेलर ब्लॅकचा समावेश आहे. त्यावेळी कंपनीने हा फोन व्हाईट कलर पर्यायासह लाँच केला नव्हता. आता कंपनीने वनप्लस 9 प्रो एका नवीन रंगात सादर केला आहे. ब्रँडने याचा एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. (OnePlus going to launch OnePlus 9 Pro White colored model, brand shares teaser video and images)

वनप्लस 9 प्रो स्मार्टफोनचं 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 64,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 69,999 रुपये या किंमतीसह सादर करण्यात आलं आहे. वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो या स्मार्टफोनसोबत ग्राहकांना जबरदस्त कॅमेरा एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनीने Hasselblad सोबत हात हातमिळवणी करत शानदार कॅमेरा डिझाईन केला आहे.

कसा आहे OnePlus 9 Pro?

OnePlus 9 Pro या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम दिले आहे. 256 जीबी पर्यंतची इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. 48MP Sony IMX789 प्रायमरी कॅमेरा सेंसर, सोबत 50MP Sony IMX766 सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला आहे. जो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेंस सोबत येतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनचे खास फीचर्स म्हणजे यात ग्राहकांना Hasselblad Pro Mode मिळणार आहे. यामध्ये पॉवरसाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी Warp चार्ज 65T सह येते. तसेच 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. अवघ्या 29 मिनिटात या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होते.

OnePlus 9 चे फीचर्स

हे स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे. वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज स्पेस वाढवता येईल. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिली आहे. वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत 50 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

इतर बातम्या

YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा

 भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री

अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात, ‘या’ 50 शहरांमध्ये सुरु केली नवीन सेवा

(OnePlus going to launch OnePlus 9 Pro White colored model, brand shares teaser video and images)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.