New smartphones | मोबाईल घ्यायचायं? थोड थांबा या कंपनीचे तब्बल तीन स्मार्टफोन ‘ऑन द वे’

OnePlus Nord N20 5G मध्ये ट्रीपल बॅक कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यात दोन मोठे लेंस असण्याची शक्यतादेखील आहे. सेल्फी प्रेमींसाठी तब्बल 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये या स्मार्टफोन्सबद्दल खूप उत्सूकता वाढली आहे.

New smartphones | मोबाईल घ्यायचायं? थोड थांबा या कंपनीचे तब्बल तीन स्मार्टफोन ‘ऑन द वे’
तीन स्मार्टफोन ‘ऑन द वे’Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:47 AM

वनप्लस (OnePlus) लवकरच आपला एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. वनप्लस नोर्ड एन 20 5जी (OnePlus Nord N20 5G) असे त्या नवीन स्मार्टफोनचे नाव सांगण्यात आले आहे. या स्मार्टफोनची पहिली झलक ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना परवडणार्या दरात हा स्मार्टफोन उपलब्ध असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. शिवाय कमी दरात असला तरी यात अनेक नवीन फिचर्स (Features) उपलब्ध आहेत. एका रिपोर्टनुसार, कंपनी लवकरच आपले तीन स्मार्टफोन बाजारात आणत आहे. ज्यांची नावे वनप्लस नोर्ड 2टी, वनप्लस नोर्ड सीई 2 लाइट आणि वनप्लस नोर्ड 3 असे आहे. या सर्व स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशनबद्दल या लेखातून जाणून घेणार आहोत. वनप्लस नोर्ड एन20 5जी स्मार्टफोन वनप्लस नोर्ड एन10 5जी हे स्मार्टफोन 2021 मध्ये लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोन्सची जागा घेणार असल्याचे म्हटले जात आहे. वनप्लस एन 20 5जी मध्ये ग्राहकांना 6.43 इंचाची एमोलेड स्क्रीन दिली जात आहे. सोबतच स्क्रीन पूर्णपणे एचडी प्लस रिझोल्यूशनसह उपलब्ध होणार आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz पर्यंत असू शकतो. यासोबत सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट स्केनरदेखील मिळणार आहे.

वनप्लस नोर्ड एन20 5जी

वनप्लस नोर्ड एन 20 5जी मध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिला जाणार आहे. यामध्ये 8 जीबीपर्यंत रॅम तर, 128 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज राहणार आहे. 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 33 डब्ल्यूचे फास्ट चार्जरदेखील मिळणार आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास यात ट्रीपल बॅक कॅमेरा सेटअप मिळणार आहे. 64 मेगापिक्सलपर्यंतचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर इतर दोन कॅमेरा 2 मेगापिक्सलचे असतील. याव्यतिरिक्त 16 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे.

वनप्लस 10 सिरीजला बाजारात

दरम्यान, नुकतेच कंपनीने आपले अनेक स्मार्टफोन वाजवी दरात बाजारात आणले आहेत. त्यासाठीच कंपनीने वनप्लस नोर्ड सिरीजची सुरुवात केली आहे. या सिरीजच्या अंतर्गत कंपनीने सीई व्हेरिएंटलादेखील बाजारात आणले आहे. आता नुकतेच वनप्लस नोर्ड सीई 2 ला ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. वनप्लस कंपनीने भारतात आपला सर्वात पहिला स्मार्टफोन म्हणजे वनप्लस 1 हा 25 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत बाजारात आणला होता. नुकतेच कंपनीने भारतात वनप्लस 10 सिरीजला बाजारात आणले आहे. याचाच एक भाग असलेला वनप्लस 10 प्रोची सुरुवातीची किंमत 64999 इतकी ठेवण्यात आली आहे.

Nagpur ZP | पंचायती राज समितीचा नागपूर दौरा; शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग

Video Buldana Fire | बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.