AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus Nord CE 2 Lite 5G, OnePlus 10R 5G : OnePlus चे लवकरच भारतात दोन स्मार्टफोन, किंमत, फिचर्स, सर्व एका क्लिकवर

वनप्लस लवकरच भारतीय बाजारपेठेत दोन हँडसेट लॉन्च करणार आहे. या दोन्ही मोबाईलची किंमत लॉन्चपूर्वी लीक झाली आहे. लीक झालेल्या बातमीवर विश्वास ठेवला तर OnePlus Nord CE 2 Lite 5G हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन असू शकतो. असेही सांगितले जात आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G, OnePlus 10R 5G : OnePlus चे लवकरच भारतात दोन स्मार्टफोन, किंमत, फिचर्स, सर्व एका क्लिकवर
OnePlus Nord CE 2 Lite 5G, OnePlus 10R 5G बद्दल सर्व माहितीImage Credit source: tv9
| Updated on: Apr 28, 2022 | 8:00 AM
Share

मुंबई : OnePlus लवकरच भारतात दोन स्मार्टफोन (Smart Phone) लॉन्च करणार आहे, जे परवडणाऱ्या किमतीत येतील. कंपनी 28 एप्रिल रोजी भारतात OnePlus 10R 5G आणि OnePlus Nord CE 2 Lite 5G लॉन्च (Mobile) करणार आहे. यासह ब्रँड OnePlus Buds देखील लॉन्च करेल. या दोन्ही हँडसेटची किंमत (Handset Price) लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे. या दोन हँडसेटचे सर्व रंग आणि कॉन्फिगरेशन तपशील देखील उघड झाले आहेत. दोन्ही हँडसेट प्रत्येकी दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असतील. OnePlus 10R 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100-MAX प्रोसेसरसह येऊ शकतो. दुसरीकडे, OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोन 64MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येईल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. काहींनी लॉन्च होणाऱ्या OnePlus स्मार्टफोनची लीक झालेली किंमत शेअर केली आहे.

OnePlus 10R 5G ची किंमत किती असेल?

OnePlus चा हा फोन 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज अशा दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला जाईल. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये असू शकते, तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. सध्याच्या चर्चांवर विश्वास ठेवला तर, डिव्हाइसचे बेस मॉडेल 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल, तर त्याचा टॉप व्हेरिएंट 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह विकला जाईल.

OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत किती असेल?

हा फोन देखील दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला जाईल. OnePlus Nord CE 2 Lite 5G च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये असू शकते. त्याच वेळी, हँडसेटचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांना मिळेल. या दोन्हीसह ब्रँड OnePlus Nord Buds लाँच करू शकतो, ज्याची किंमत 2999 रुपये असेल.

या फोनची खासियत काय असेल?

कंपनी आधीच OnePlus 10R 5G चीनमध्ये OnePlus ACE नावाने लॉन्च करणार आहे. हा फोन रिअॅलिटीच्या GT Neo 3 चा रीब्रँडेड असेल, जो या वर्षी मार्चमध्ये जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आला होता. हा फोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही जर नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही या फोनची थोडीशी वाट बघू शकता. त्याने तुम्हाला आणखी चांगले पर्याय उपलब्ध होतील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.