OnePlus: मोबाईल प्रेमींसाठी आनंदाची बातमी, वन प्लसच्या ‘या’ फोनची किंमत घसरली

OnePlus ने आपल्या Nord CE 5 ची किंमत कमी केली आहे. 7,100mAh ची शक्तिशाली बॅटरी असणारा हा फोन OnePlus Nord 5 सोबत लाँच करण्यात आला होता. कंपनीने याच्या किमतीत कपात केली आहे.

OnePlus: मोबाईल प्रेमींसाठी आनंदाची बातमी, वन प्लसच्या या फोनची किंमत घसरली
oneplus-nord-ce-5
| Updated on: Jul 25, 2025 | 7:59 PM

नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. OnePlus ने आपल्या Nord CE 5 ची किंमत कमी केली आहे. 7,100mAh ची शक्तिशाली बॅटरी असणारा हा फोन OnePlus Nord 5 सोबत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कंपनीने याच्या किमतीत कपात केली आहे. Amazon वर हा फोन लॉन्चिंग प्राईसपेक्षा कमी दरात मिळत आहे. याची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.

Onlus Nord CE 5 मधील फीचर्स

OnePlus च्या या फोनमध्ये 6.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळत आहे. हा डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 1430 nits पर्यंत ब्राइटनेस मिळतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8350 Apex प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 12 GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 7100 mAh बॅटरी आहे जी, 80W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Onlus Nord CE 5 हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित OxygenOS 15 वर काम करतो. या फोनमध्ये Google Gemini आधारित AI फीचर्स देखील मिळतात. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड, ब्लूटूथ मिळतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही मिळतो. या फोनच्या मागील बाजूस 50 MP मेन आणि 8 एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळतो. तसेच या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत किती?

OnePlus Nord CE 5 हा फोन कंपनीने 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB या 3 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये ला लाँच केला होता. आता या फोनची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 26999 रुपये आणि 28999 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांची त्वरित सूट मिळत आहे.

तसेच OnePlus Nord CE 5 या फोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुम्ही जुना फोन दिला तर यावर 23450 रुपयांपर्यंत एक्सचेंज मिळत आहे. हा फोन मार्बल मिस्ट, ब्लॅक इन्फिनिटी आणि नेक्सस ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत कमी झाल्याने याची विक्री वाढेल अशी आशा कंपनीला आहे.