दमदार फीचर्स असलेल्या Oppo Find X9 Ultra ची विक्री सुरू, बँक कार्डवर 16 हजार 999 रुपयांची मिळवा सूट

ओप्पो फाइंड एक्स9 अल्ट्रा 26 मे पासून ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह 7050mAh बॅटरी यांसारखी पॉवरफुल वैशिष्ट्ये आहेत. निवडक बँक कार्ड्सच्या वापराने हा फोन खरेदी करताना तुम्हाला 16 हजार 999 रूपयांची त्वरित सूट देखील उपलब्ध होईल. चला तर मग या सुटचा लाभ कशाप्रकारे घेता येईल ते जाणून घेऊयात.

दमदार फीचर्स असलेल्या Oppo Find X9 Ultra ची विक्री सुरू, बँक कार्डवर 16 हजार 999 रुपयांची मिळवा सूट
Oppo Find X9 Ultra
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 29, 2026 | 8:05 AM

ओप्पो फाइंड एक्स9 सिरीजमधील हा फोन 26मे रोजी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, क्वाड रिअर कॅमेरा, 16 जीबी रॅम, 100 वॉट वायर्ड चार्जिंग आणि सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे. हा फोन खरेदी करताना तुम्हाला 16 हजार 999 रूपयांची सूट देखील मिळेल. ओप्पोचा हा फ्लॅगशिप फोन सॅमसंग, ॲपल, व्हिवो आणि मोटोरोलाच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल. चला तर मग मोठ्या डिस्काउंटनंतर या फोनची किंमत किती होते.

भारतात ओप्पो फाइंड एक्स9 अल्ट्राची किंमत

टुंड्रा अंबर आणि कॅनियन ऑरेंज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या ओप्पो स्मार्टफोनच्या 12GB/512GB व्हेरिएंटची किंमत 1 लाख 69 हजार 999 रूपये आहे. हा फोन ॲपल आयफोन 17 प्रो मॅक्स, सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड6 5G, विवो एक्स फोल्ड5 5G आणि मोटोरोला रेझर फोल्ड यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो. निवडक बँक कार्ड्सद्वारे नॉन-ईएमआय व्यवहारांवर ओप्पोच्या या फोन करिता 16 हजार 999 रूपयांची त्वरित सूट देखील मिळेल.

ओप्पो फाइंड एक्स9 अल्ट्रा स्पेसिफिकेशन्स

अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.82-इंचाचा क्वाड एचडी+ फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे. यात कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण आणि 1800 निट्सपर्यंतची कमाल ब्राइटनेस आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर आणि ॲड्रेनो 840 GPU द्वारे समर्थित, यात 7050mAh बॅटरी आहे. तर या फोनची बॅटरी ही 50W वायरलेस आणि 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

हॅसलब्लॅड-ट्यून केलेल्या क्वाड रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 200-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 200-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-टेलीफोटो सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फीसाठी 50-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. हा फोन 30fps 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि 120fps 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये NFC, ब्लूटूथ 6.0, GLONASS, Wi-Fi 7, एक टाइप-सी पोर्ट आणि GPS यांचा समावेश आहे. या हँडसेटमध्ये 3डी अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा देखील आहे.

Follow Us