
PM Narendra Modi Appeal to Swadeshi Tech : भारतावर अमेरिकेचा दबाव वाढत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर आज औषधी क्षेत्रालाही ट्रम्प यांनी धक्का दिला. H1-B व्हीसाचे शुल्क 88 लाख रुपयांच्या घरा गेले आहे. आता देशी डिजिटल प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढत आहे. देशात अमेरिकन ॲप्सवर बहिष्काराचे अस्त्र वापरण्यात येण्याची शक्यता आहे. अशावेळी ते कोणते स्वदेशी टेक आहे जे या अमेरिकन ॲप्सला धोबीपछाड देऊ शकतात. पर्याय ठरू शकतात?
1. WhatsApp : Arattai
Zoho Corporation ने Arattai हे WhatsApp प्रमाणे सुरक्षीत भारतीय ॲप तयार केले आहे. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, ग्रुप चॅट आणि मल्टिमीडिया शेअरिंगची सुविधा देते. हे ॲप ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिनिधीत्व करते. तर हे ॲप WhatsApp इतके लोकप्रिय होईल का, हा प्रश्न आहे.
2. Google Maps : Mappls
MapmyIndia चे Mappls, Google Maps साठी भारतीय पर्याय आहे. या ॲपमध्ये सविस्तर नकाशा, सध्या ट्रॅफिकची स्थिती काय आहे आणि ठिकाणाची माहिती देते. शहरासह ग्रामीण भागातील रस्ते दाखवते. Mappls भारतीय भूगोल जाणून आहे. ते नॅव्हीगेशन आणि स्थानिक माहिती देते.
3. Microsoft Word / Google Docs : Zoho Writer
Zoho Writer हे दमदार वर्ड प्रोसेसिंग टूल आहे. Microsoft Word साठी हा पर्याय आहे. क्लाउड-आधारित हा प्लॅटफॉर्म एडिटिंग, फॉर्मेटिंग आणि इतर सोयी सुविधा पुरवतो.
4. Microsoft Excel : Zoho Sheet
Zoho Sheet, Excel ची भारतीय आवृत्ती आहे. ही स्प्रेशीट सॉफ्टवेअर डेटा विश्लेषण, चार्टिंग टूल आणि रिअल टाईमसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. व्यावासायिक आणि व्यक्तिगत उपयोगासाठी ते डिझाईन करण्यात आले आहेत.
5. Microsoft PowerPoint : Zoho Show
प्रेझेंटेशनसाठी Zoho Show, PowerPoint हा पर्याय आहे. हे ॲप भारतीयांना आकर्षक स्लाईडशो, टेम्पलेट आणि इतर फीचर्स तयार करण्यासाठी सुविधा देते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात PowerPoint ऐवजी Zoho Show चा वापर केला होता.
6. Gmail: Zoho Mail
Zoho Mail, Gmail साठी चांगला पर्याय आहे. यामध्ये थेट इंटरफेस, ईमेल व्यवस्थापन आणि Zoho प्रोडक्टिव्हिटी ॲप्सचे इंटिग्रेशन आहे.
7. Adobe Sign: Zoho Sign
Zoho Sign, Adobe Sign ला भारतीय पर्याय आहे. येथे डिजिटल सिग्नेचर आणि दस्तावेज सत्यापन करता येते. हा पडताळा सुरक्षितरित्या होतो.
8. Amazon: Flipkart
ई-कॉमर्सच्या क्षेत्रात Flipkart हे Amazon साठी स्वदेशी पर्याय ठरत आहे. येथे इलेक्ट्रॉनिक्सपासून ते दैनंदिन उपयोगातील अनेक वस्तू, उत्पादनं खरेदी करता येतात.