
Poco या स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या एम सीरीजमधील एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Poco M8 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 3200 निट्स पीक ब्राइटनेस, 3डी कर्व्ड डिस्प्ले, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप यांचा समावेश आहे. कंपनी या स्मार्टफोनसाठी चार वर्षांचे ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत, हा फोन कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि त्यात इतर कोणते प्रमुख फीचर्स आहेत ते जाणून घेऊयात
या पोको स्मार्टफोनच्या 6 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 21,999 रूपये तर 8 जीबी रॅम/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 22 हजार 999 रूपये आणि 8 जीबी रॅम/256 जीबी व्हेरिएंटची किंमत 24 हजार 999 रूपये आहे. या फोनची विक्री 13 जानेवारी 2026 पासून सुरू होईल. सेलच्या पहिल्या 12 तासांत, ग्राहकांना अतिरिक्त 1000 रुपयांची सूट आणि 2000 रुपयांची बँक ऑफर मिळेल.
याचा अर्थ 3000 रुपये सूट मिळण्याची उत्तम संधी आहे. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, या रेंजमध्ये पोकोचा हा नवीनतम फोन MOTOROLA Edge 60 Fusion 5G, vivo T4 5G आणि realme 14 Pro+ 5G सारख्या स्मार्टफोन्सना कडक स्पर्धा करणार आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: हा ड्युअल सिम स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित हायपरओएस 2.0 वर काम करतो.
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.7-इंचाचा 3D कर्व्ड डिस्प्ले आहे जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन Wet Touch 2.0 ला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे वापरकर्ते ओल्या हातानींही हँडसेट वापरू शकतात.
चिपसेट: या हँडसेटमध्ये 2.4GHz चा स्नॅपड्रॅगन 6 जनरेशनचा ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, तसेच ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो GPU आहे. कंपनीचा दावा आहे की या फोनने AnTuTu बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर 825,000 गुण मिळवले आहेत.
कॅमेरा सेटअप: फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा लाईट फ्यूजन 400 सेन्सर आहे. सेल्फीसाठी, 20-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 45 वॅट वायर्ड आणि 18 वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट असलेली पॉवरफूल 5520 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
कनेक्टिव्हिटी: या फोनमध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ व्हर्जन 5.1, वाय-फाय 5 आणि USB टाइप-सी पोर्ट आहे. सुरक्षेसाठी, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.