AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी, POCO चा नवा 5G फोन 9 नोव्हेंबरला होणार लाँच

POCO कंपनी 9 नोव्हेंबर रोजी त्यांचा नवा 5 जी स्मार्टफोन POCO M4 Pro 5G लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील.

33W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी, POCO चा नवा 5G फोन 9 नोव्हेंबरला होणार लाँच
POCO
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 11:12 AM
Share

मुंबई : POCO कंपनी 9 नोव्हेंबर रोजी त्यांचा नवा 5 जी स्मार्टफोन POCO M4 Pro 5G लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. तसेच, हा फोन अनेक लेटेस्ट फीचर्ससह सादर केला जाईल. आतापर्यंत, कंपनीकडून या फोनच्या स्पेसिफिकेशनचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, परंतु नवीन ट्विटनुसार, या फोनमध्ये 6 एनएम चिपसेट आणि 33W फास्ट चार्जर मिळेल. हा स्मार्टफोन POCO M3 Pro 5G चा अपग्रेड व्हेरिएंट असेल. (POCO M4 Pro 5G will launch on 9 November, smartphone will come with 33W fast charger)

हा स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चं अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जो या वर्षी मे मध्ये लॉन्च झाला होता. या स्मार्टफोनचा टीझर रिलीज करताना कंपनीने Power Up Your Fan अशी टॅगलाईन दिली आहे. आतापर्यंत या फोनबाबत अनेक लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन अलीकडेच Geekbench वर लिस्ट केलेला दिसला, ज्याचा मॉडेल क्रमांक 21091116AC आहे आणि C चा अर्थ चायनिज व्हेरिएंट असा आहे. या लिस्ट वरून हे समोर आले आहे की या डिवाइसमध्ये MediaTek Dimension 810 chipset चा वापर केला जाऊ शकतो, तर काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, हा फोन MediaTek Dimension 700 प्रोसेसर सह लॉन्च केला जाईल.

पोकोच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम दिला जाऊ शकतो. याच्या सॉफ्टवेअर डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यासोबतच कंपनीचा कस्टम MIUI देखील यामध्ये उपलब्ध असेल. Poco चा हा फोन 5G NR कनेक्टिव्हिटीसह येईल. तसेच या फोनमध्ये NFC सपोर्ट, GNSS आणि FM रेडिओ सपोर्ट उपलब्ध असेल.

शानदार कॅमेरा

Poco M4 Pro 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त ठरेल. तसेच, बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.

पॉवरफुल बॅटरी

चार्जिंग क्षमता वाढवण्यासाठी कंपनी यामध्ये 33W फास्ट चार्जर देऊ शकते. जुन्या लीक्स रिपोर्टनुसार, हा फोन 5000mAh बॅटरीसह सादर होऊ शकतो, तसेच यात 8 GB पर्यंत रॅम आणि बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. हा फोन रेडमी ब्रँडच्या स्मार्टफोनची रीब्रँडेड आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा फोन Redmi Note 11 चं वेगळं व्हर्जन असेल.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(POCO M4 Pro 5G will launch on 9 November, smartphone will come with 33W fast charger)

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.