AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्विटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी

गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच झाल्यापासून ट्वीटरवर व्हॉईस ट्वीट आतापर्यंत आयओएस युजर्ससाठी मर्यादित आहे. याचा अर्थ असा की केवळ आयओएस अ‍ॅपसाठी ट्वीटरमध्ये आपले व्हॉइस ट्वीट रेकॉर्ड करण्याची आणि पोस्ट करण्याची क्षमता आहे.

ट्विटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी
ट्वीटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 4:37 PM
Share

नवी दिल्ली : ट्विटरने गेल्या वर्षी आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस ट्वीट सादर केले, जेणेकरुन युजर्स त्यांच्या आवाजासह ट्वीट करू शकतील. मजकूर टाईप न करता ट्वीटरवर तातडीने ट्वीट पोस्ट करण्यास व्हॉईस ट्वीट मदत करते. आपण आपले प्रारंभिक व्हॉईस ट्वीट पोस्ट केल्यानंतर तुमचा मजकूर ट्वीट्सला फॉलोअपच्या रुपात जोडू शकता. हे केवळ ट्वीट करणाऱ्या युजर्ससाठीच नव्हे तर त्यांच्या फॉलोअर्ससाठीही उपयुक्त आहे. फॉलोअर्सना एक वेगळा अनुभव घेता येतो. कारण ते ट्वीट केलेला संदेश वाचण्याऐवजी ते ट्वीट ऐकू शकतील. (Post your voice on Twitter Tweet; Just these simple things you have to do)

व्हॉईस ट्वीट्स ट्विटरवर एक पर्सनल टचही आणतात. कारण लोक आपल्या आवाजाचा वापर करून मायक्रोब्लॉगिंग नेटवर्कवर अपडेट पोस्ट करण्यात सक्षम असतात. गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच झाल्यापासून ट्विटरवर व्हॉईस ट्वीट आतापर्यंत आयओएस युजर्ससाठी मर्यादित आहे. याचा अर्थ असा की केवळ आयओएस अ‍ॅपसाठी ट्विटरमध्ये आपले व्हॉइस ट्वीट रेकॉर्ड करण्याची आणि पोस्ट करण्याची क्षमता आहे. तथापि, आयओएस व्यतिरिक्त डेस्कटॉप, अँड्रॉईड आणि इतर प्लॅटफॉर्मवरील लोकांचीही आयओएस युजर्सनी पोस्ट केलेले व्हॉइस ट्वीट प्ले करण्याची क्षमता आहे.

कंपनीने अलीकडेच ऑटो- जेनरेटेड ट्रान्सक्रिप्ट प्रदान करण्याचा पर्यायदेखील जोडला आहे. आपल्याकडे आपल्या आयफोन किंवा आयपॅडवर ट्विटर अ‍ॅप आहे आणि तुम्ही विचार करताय की आपले व्हॉइस ट्वीट पोस्ट कसे करायचे, तर या प्रश्नाचेच उत्तर देण्यासाठी आम्ही आपल्याला येथे व्हॉइस ट्वीटबाबत अधिक माहिती देत आहोत.

ट्विटरवर व्हॉईस ट्वीट्स कसे वापरावे?

आपण ट्विटरवर व्हॉईस ट्वीट्स कसे वापरू शकता, याकडे लक्ष वळवण्याआधी हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की आपण प्रत्येक व्हॉईस ट्वीटसाठी दोन मिनिटे आणि 20 सेकंदपर्यंत रेकॉर्ड करू शकता. आपला संदेश दिलेल्या वेळेच्या मर्यादेपेक्षा मोठा असल्यास आपला संदेश स्वयंचलितरित्या 25 ट्वीटपर्यंत थ्रेड केला जाईल.

1. आपल्या आयफोन किंवा आयपॅडवर ट्विटर अ‍ॅप उघडा.

2. खाली उजव्या बाजूला असलेल्या ‘ट्वीट कम्पोज’ आयकॉनवर टॅप करा.

3. आता कीबोर्डवरील उपलब्ध ‘वेव्हलेन्थ’ व्हॉईस ट्वीट आयकॉन दाबा. यामुळे तुमचा मेसेज रेकॉर्ड होण्यास सुरुवात होईल.

4. जेव्हा तुमचा संदेश समाप्त होईल, त्यावेळी टॅप करा.

तुम्ही तुमच्या व्हॉइस ट्वीटमध्ये मजकूरात फॉलो-अप ट्वीट्स जोडू शकता. तथापि, येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ऑडिओ ट्वीट्सला रिप्लाय आणि कोट ट्वीट फिचरच्या माध्यमातून पोस्ट करू शकत नाही. तुम्ही तुमचे व्हॉईस ट्वीट केवळ मूळ ट्वीट्सच्या रुपात रेकॉर्ड करू शकता. ट्वीटर युजर्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस ट्वीटच्या रुपात कोणतीही ऑडिओ फाईल थेट अपलोड करण्याची परवानगी देत नाही. (Post your voice on Twitter Tweet; Just these simple things you have to do)

इतर बातम्या

Video | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा

Health Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या!

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.