किंमत फक्त 5999, हायटेक फीचरचा कूल पॅड 3 भारतात लाँच

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : चिनी स्मार्टफोन कंपनी कूलपॅडने भारतात एक नवीन स्मार्टफोन Coolpad Cool 3 लाँच केला आहे. हा बजेट स्मार्टफोन आहे आणि यामध्ये ड्युअल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉर्च स्टाईल डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे. तसेच हा स्मार्टफोन चार कलर व्हेरिऐंटमध्ये उपलब्ध होईल. यामध्ये मिडनाईट ब्लू, रुबी ब्लॅक, ओशन इंडिगो आणि टील ग्रीन […]

किंमत फक्त 5999, हायटेक फीचरचा कूल पॅड 3 भारतात लाँच

Follow us on

मुंबई : चिनी स्मार्टफोन कंपनी कूलपॅडने भारतात एक नवीन स्मार्टफोन Coolpad Cool 3 लाँच केला आहे. हा बजेट स्मार्टफोन आहे आणि यामध्ये ड्युअल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉर्च स्टाईल डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे. तसेच हा स्मार्टफोन चार कलर व्हेरिऐंटमध्ये उपलब्ध होईल. यामध्ये मिडनाईट ब्लू, रुबी ब्लॅक, ओशन इंडिगो आणि टील ग्रीन कलर ऑप्शन्स दिले आहेत.

हा स्मार्टफोन सध्या ऑनलाईन मिळतो आणि या स्मार्टफोनच्या विक्रीची सुरुवात या आठवड्याच्या शेवटी होईल. ऑफलाईन सेलबद्दल अजून काही माहिती कंपनीने दिली नाही. भारतातील मार्केटमध्ये हा स्मार्टफोन थेट Redmi 6A टक्कर देणार आहे. या स्मार्टफोनची बॅक पॅनल वेगवेगळ्या रंगात दिले आहे. हा कूलपॅडचा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये वॉटर ड्रॉप नॉर्च आणि Android 9 Pie सोबत लाँच केले आहे.

कूल पॅड 3 मध्ये रिअर ड्यूअल कॅमेरा सेटअप दिला आहे. एक लेंस 8 मेगापिक्सल आणि एलईडी फ्लॅश दिली आहे. तर दुसरा कॅमेरा 0.3 मेगापिक्सलचा आहे. सेल्फिसाठी यामध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हीटी ऑप्शन्ससाठी यामध्ये ब्लूटूथ,वायफाय, 4जी आणि ड्यूअल सिम स्मार्टफोन आहे.

कूलपॅडने भारतात नुकतेच कूलपॅड मेगा 5, 5M आणि 5C लाँच केले आहेत आणि त्याची सुरुवातीची किंमत 3,999 रुपये होती. सध्या हे स्मार्टफोन ऑफलाईन तुम्ही खरेदी करु शकता. या स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 2,000mAh  आहे.

Coolpad Cool 3 फीचर

  •  5.71 इंच आकाराचा एचडी प्लस डिस्प्ले
  • 2 जीबी रॅम
  • 16 जीबी इंटर्नल स्टोअरेज
  •  1.3GHz ऑक्टाकोर प्रोसेसर
  • 3,000mAh बॅटरी
  • फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल
  • रिअर कॅमेरा (ड्यूअल) 8+0.3 मेगापिक्सल

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI