AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8000 रुपयांच्या रेंजमध्ये Realme चा ढासू स्मार्टफोन बाजारात, लो बजेटमध्ये 5000mAh बॅटरीसह ट्रिपल कॅमेरा

Realme ने गेल्या आठवड्यात भारतात C21Y स्मार्टफोन लाँच केला. रियलमी C21Y हा लेटेस्ट एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोठी बॅटरी आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.

8000 रुपयांच्या रेंजमध्ये Realme चा ढासू स्मार्टफोन बाजारात, लो बजेटमध्ये 5000mAh बॅटरीसह ट्रिपल कॅमेरा
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 8:05 PM
Share

मुंबई : Realme ने गेल्या आठवड्यात भारतात C21Y स्मार्टफोन लाँच केला. रियलमी C21Y हा लेटेस्ट एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोठी बॅटरी आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन सी सीरीजच्या फोनसारखाच आहे. C21Y लाइट वापरकर्त्यांसाठी एक उत्तम फोन आहे. त्याच वेळी, जे लोक फीचर फोनवरून स्मार्टफोनवर स्विच करत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा हा फोन एक उत्तम पर्याय आहे. (Realme C21Y available to buy on flipkart with 5000mAh battery and 13 megapixel triple camera in 8K range)

गेल्या महिन्यात व्हिएतनाममध्ये Realme C21Y लाँच करण्यात आला होता. एंट्री लेव्हल स्मार्टफोन असूनही, यात अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, यात आय प्रोटेक्शन फीचरचाही समावेश आहे. Realme C21Y TUV Rheinland प्रमाणित डिस्प्ले वापरते, जो हाय ब्राईटनेस, व्हाइट लाइट आणि आय प्रोटेक्शन फीचरसह येतो.

रियलमी C21Y ची किंमत 8,999 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. त्याचबरोबर 9,999 रुपयांमध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळते. हा फोन क्रॉस ब्लू आणि क्रॉल ब्लॅक रंगात येतो. हा फोन विक्रीसाठी सोमवारपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे.

फोनचे फीचर्स

Realme C21Y हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिम कार्ड आणि 4G VoLTE सह येतो. यात अँड्रॉइड 10 आधारित Realme यूआय सॉफ्टवेअर देखील आहे. Realme आधीच अधिकाधिक स्मार्टफोनमध्ये Android 11 देत आहे. फोनमध्ये Octa core Unisoc T610 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 4 जीबी LPDDR4x रॅम आहे, जो 64 जीबी स्टोरेजसह येतो. त्याचबरोबर स्टोरेज वाढवण्यासाठी त्यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे.

रियलमी C21Y मध्ये 6.5-इंचांचा HD + डिस्प्ले आहे जो Teardrop Notch सह येतो. फोनमध्ये 88.7 टक्के पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा आहे. नॉचमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.

इतर बातम्या

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा

30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…

(Realme C21Y available to buy on flipkart with 5000mAh battery and 13 megapixel triple camera in 8K range)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....