AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme चा दमदार बॅटरीवाला फोन येतोय, एका चार्जमध्ये तीन दिवस मजा !

Realme कंपनीने भारतात नवा फोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. या फोनमध्ये तगडी बॅटरी मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन कलरच पर्याय मिळणार आहे आणि हा फोन फ्लिपकार्टवर देखील विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Realme चा दमदार बॅटरीवाला फोन येतोय, एका चार्जमध्ये तीन दिवस मजा !
Realme 16T 5G
| Updated on: May 12, 2026 | 5:52 PM
Share

Realme ने त्याचा नवीन स्मार्टफोन रिअलमी Realme 16T 5G च्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनी या फोनला भारतात 22 मे रोजी लाँच करणार आहे. लाँचच्या आधीच या फोनचे खास फिचर समोर आले आहेत. यात याची मोठी 8000mAh बॅटरीची सर्वात जास्त चर्चा आहे. कंपनीने दावा केला आहे की या फोनला एकदा चार्ज केल्यानंतर तीन दिवसापर्यंत याची बॅटरी चालते. दमदार बॅटरी, नवीन डिझाईन आणि 5 जी सपोर्टसह हा फोन मिड रेंज मार्केटमध्ये मोठी स्पर्धा तयार करु शकतो.

लाँच डेट आणि कलर ऑप्शन

रिअलमीने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की रिअलमी 16टी 5जी ला भारतात २२ मे रोजी दुपारी १२ वाजता लाँच केले जाईल. कंपनीने हे देखील सांगितले की हा फोन स्टारलाईट ब्लॅक, स्टारलाईट रेड आणि ब्ल्यू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि रिअलमी इंडियाची अधिकृत वेबसाईटद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. रिअलमी १६ सिरीजमधील हे चौथे मॉडेल आहे.कारण याच्या आधी रिअलमी १६, रिअलमी १६ प्रो आणि रिअलमी १६ प्रो प्लस लाँच केले आहेत. कंपनीने लाँचच्या आधी फोनसाठी मायक्रो साईट देखील लाईव्ह केली आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की येत्या काही दिवसात आणखी फिचर्सचा खुलासा केला जाणार आहे.

8000mAh ची तगडी बॅटरी

रिअलमी 16 टी 5 जी सर्वात मोठी खास बाब म्हणजे याची 8000mAhची टायटन बॅटरी म्हटली जात आहे. कंपनीने दावा केला आहे की फोन एकदा चार्ज केल्यानंतर तीन दिवस वापरता येणार आहे. रिअलमीनुसार फोनमध्ये १४.३ तासांपर्यंत गेमिंग, ३४ तासांपर्यंत सोशल मीडिया स्क्रॉलिंग आणि सुमारे २१.९ तासापर्यंत नेव्हीगेशनचा सपोर्ट मिळेल. कंपनीने हा देखील दावा करत आहे की बॅटरी सात वर्षांपर्यंत चांगला परफॉर्मन्स करेल. फोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग, बायपास चार्जिंग आणि वायर्ड रिवर्स चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. मोठी बॅटरी असूनही या फोनची जाडी केवळ ८.८ मिमी ठेवण्यात आली आहे.

डिझाईन आणि प्रोसेसर

रिअलमी 16टी 5जी फोनला फ्लॅट रिअर पॅनल डिझाईनसह सादर करण्यात येणार आहे. फोनच्या मागे चौकोनी आकाराचा कॅमेरा मॉड्युल मिळणार आहे. ज्यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, एलईडी फ्लॅश आणि सेल्फी मिरर देखील असणार आहे. पॉवर बटण, व्हॉल्युम कंट्रोल फोनच्या उजव्या बाजूला असेल. बातमीनुसार हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेरस सोबत येऊ शकतो. गीकबेंच लिस्टींगनुसार यात ऑक्टो कोर चिपसेट असणार आहे. ज्यात दोन परफॉर्मेंस कोर 2.4GHz स्पीड आणि सहा एफिशियन्सी कोर 2GHz स्पीडवर काम करतील. फोनमध्ये किमान ८ जीबी रॅम, एंड्रॉईड १६ आणि माली जी५७ एमसी २ जीपूयू मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....