Realme कंपनी 20 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या स्वस्त फोन कधी उपलब्ध होणार

तीन वर्षाच्या वर्धापनदिनानिमित्त Realme ने 5G शिखर परिषद आयोजित केली होती, यासाठी कंपनीने GSM असोसिएशन, क्वालकॉम आणि काउंटरपॉईंट रिसर्चसह भागीदारी केली.

Realme कंपनी 20 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या स्वस्त फोन कधी उपलब्ध होणार
Realme 5G smartphones
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 10:37 PM

मुंबई : तीन वर्षाच्या वर्धापनदिनानिमित्त Realme ने 5G शिखर परिषद आयोजित केली होती, यासाठी कंपनीने GSM असोसिएशन, क्वालकॉम आणि काउंटरपॉईंट रिसर्चसह भागीदारी केली. या भागीदारीच्या मदतीने ही कंपनी जगातील लाखो वापरकर्त्यांपर्यंत 5G कनेक्टिव्हिटी पोहोचवेल. कीनोट दरम्यान, Realme ने जाहीर केले की, कंपनी 2024 पर्यंत 100 मिलियन अ‍ॅक्टिव्ह 5 जी स्मार्टफोन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू इच्छित आहे. त्याचबरोबर कंपनीला येथे आपला 5 जी शेअर 70 टक्क्यांपर्यंत वाढवायचा आहे, पुढच्या वर्षी कंपनी 50 बाजारपेठांना टार्गेट करणार आहे. त्याचबरोबर कंपनी 2022 पर्यंत युजर्ससमोर 20 नवे 5G स्मार्टफोन सादर करण्याची योजना आखत आहे. (Realme planning to launch more than twenty 5G Smartphones by the end of 2022)

अशा परिस्थितीत, Realme कंपनी लोकांना स्वस्त किंमतीत 5G डिव्हाइस वितरित करेल. येत्या काही वर्षांत Realme इथल्या लोकांना फक्त 7000 रुपयांमध्ये 5G फोन देईल. कंपनीने जीटी सिरीजअंतर्गत दोन नवीन फोन बाजारात आणण्याची योजना आखली आहे. हे स्मार्टफोन यावर्षी डेब्यू करू शकतात, तर दुसरा फोन जो कॅमेरा फ्लॅगशिप असेल तो जुलै महिन्यात लाँच होईल.

Realme कंपनी पुढील दोन वर्षांत 90% R&D रिसोर्सचा वापर करेल आणि 5 जी उत्पादन विकासात सुमारे 300 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करेल. ही कंपनी संपूर्ण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात R&D केंद्रे स्थापित करणार आहे. तसेच युरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतही R&D केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.

12 जूनला Realme नवा फोन लाँच करणार

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी (Realme) आपला परवडणारा स्मार्टफोन Realme C25s 12 जूनला लाँच करणार आहे. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. बातमीनुसार, हा फोन Realme C25 सारख्या डिस्प्लेसह येईल, मात्र याचा कॅमेरा अपग्रेड केला जाणार आहे. तसेच यात अपडेटेड प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.

थायलंडमधील सर्टिफिकेशन साइट नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकम्युनिकेशन कमिशन (NBTC) आणि रशियाच्या युरेशियन इकोनॉमिक कमिशनला (EEC) ला भेट दिल्यानंतर या फोनची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. Realme C25s सर्टिफिकेशन साइटवर RMX3195 मॉडेल नंबरसह नोंदणीकृत आहे. GizChina ने या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन उघड केले असून 12 जूनला हा फोन चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Realme C25s ची किंमत

Realme C25s च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 170 डॉलर्स (जवळपास 12,300 रुपये) इतकी असू शकते. याशिवाय कंपनी हा फोन चीनसह भारतामध्येही सादर करू शकते, अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. तथापि, भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असेल याबद्दल अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही.

Realme C25s चे स्पेसिफिकेशन्स

या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास या फोनला 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले मिळेल, ज्याचं रिझोल्यूशन 720X1600 पिक्सल इतकं असेल. यासह या फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच देता येईल. या व्यतिरिक्त त्यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलीओ G58 SoC प्रोसेसर मिळेल. यापूर्वी रिअलमी सी 25 मध्ये मीडियाटेक हेलिओ G70 प्रोसेसर देण्यात आला होता. हा फोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येईल, याची स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येईल.

कॅमेरा

Realme C25s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर असेल. सोबत यामध्ये 2-2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे असू शकतात. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Realme planning to launch more than twenty 5G Smartphones by the end of 2022)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.