OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Nord N10 5G फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल.

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Oneplus Nord 2
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 5:58 PM

मुंबई : वनप्लस नॉर्ड CE 5G या स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत कंपनीने नुकतीच पुष्टी केली आहे. कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांनी म्हटले आहे की, वनप्लस डिव्हाइस 10 जूनला भारत आणि युरोपमध्ये लाँच केलं जाईल. गेल्या वर्षी लाँच झालेल्या वनप्लस नॉर्डचं नेक्स्ट व्हर्जन म्हणून वनप्लस नॉर्ड CE 5G लाँच केला जात आहे. मुलाखतीदरम्यान लाऊ यांनी वनप्लस नॉर्ड CE 5G च्या वैशिष्ट्यांविषयी खुलासा केला नाही. (OnePlus Nord CE 5G will launch in India on 10th june)

लाऊ यांनी एक गोष्ट निश्चितपणे सांगितली की, हा फोन स्वस्त दरात लाँच केला जाईल. ते म्हणाले की, आम्ही या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. अशा परिस्थितीत भारतात या फोनची किंमत 20,000 रुपये इतकी असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा 5G स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर हा फोन Amazon इंडियाच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येईल.

लाऊ म्हणाले की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस नॉर्ड N200 5 जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. तथापि, हा फोन केवळ अमेरिका आणि कॅनडामध्ये लाँच केला जाईल. परंतु यावेळी लाऊ यांनी या फोनच्या स्पेक्सबद्दल कोणतीही माहिती उघड केली नाही.

कसा आहे OnePlus Nord N10 5G?

या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. एसडी कार्डच्या मदतीने फोनचं स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे. सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

दमदार बॅटरी

नॉर्ड N10 5G अँड्रॉयड 10 वर आधारित ऑक्सीजन ओएस 10.5 आऊट ऑफ दी बॉक्सवर काम करतो. या फोनमध्ये 4300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30T फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 21,990 रुपये इतकी आहे.OnePlus

इतर बातम्या

वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार

Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…

(OnePlus Nord CE 5G will launch in India on 10th june)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.