
आपल्या भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. तर काही टेलिकॉम त्यांच्या युजर्ससाठी कमी किंमतीच्या चांगल्या सुविधा देणारे प्लॅन लाँच करत असतात. जेणेकरून त्यांच्या कंपनीचे ग्राहक अधिक वाढवतील. जर तुम्ही कमी खर्चात जास्त काळ टिकणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. अशातच रिलायन्स जिओ सुद्धा प्रीपेड कार्डच्या वापरकर्त्यांसाठी अनेक उत्तम प्लॅन लाँच करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत जे एअरटेल कंपनीच्या या प्लॅन पेक्षा 50 रुपयांनी स्वस्त आहे. तर जिओच्या या प्लॅनची किंमत 249 रुपये असून एअरटेल कंपनीच्या 299 रुपयांच्या या प्लॅनला कडक टक्कर देणारा आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही कंपनी तुम्हाला 249 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कोणते जबरदस्त फायदे देईल ते जाणून घेऊयात…
रिलायन्स जिओच्या या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 जीबी हाय स्पीड डेटा, लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातील. तसेच या रिचार्ज प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे, त्यामुळे तुम्हाला जिओ क्लाउड आणि जिओ टीव्ही सारख्या ॲप्सचा मोफत ॲक्सेस देखील मिळतो. यामध्ये तुमचा डेली डेटा संपला तर डाटाची वेग मर्यादा 64kbps पर्यंत कमी होते.
299 रुपयांच्या या एअरटेल प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1जीबी हाय स्पीड डेटा, मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. 28 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन स्पॅम कॉल आणि एसएमएससाठी अलर्ट आणि महिन्यातून एक मोफत हॅलोट्यूनचा अॅक्सेस देखील देतो.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की दररोज 100 एसएमएस वापरल्यानंतर, तुम्हाला प्रत्येक SMSसाठी 1 रुपये शुल्क आकारले जाईल. त्याचवेळी एका एसटीडी SMSसाठी 1.5 रुपये शुल्क द्यावे लागेल. जिओ प्रमाणे, एअरटेलच्या या प्लॅनमध्येही डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड 64kbpsपर्यंत कमी होईल.
जिओ आणि एअरटेलच्या प्लॅनमधील फरकाबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही प्लॅनमध्ये समान डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. अतिरिक्त फायद्यांमध्ये निश्चितच फरक असू शकतो, परंतु या फरकासाठी ५० रुपये अतिरिक्त खर्च करणे योग्य आहे की नाही हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे.