Reliance jio कडून 1 रुपयाचा रिचार्ज सादर, 395 रुपयांमध्ये 84 दिवसांचा प्लॅन

| Updated on: Dec 15, 2021 | 5:36 PM

Vi, Airtel, Reliance Jio ने अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. या कंपन्यांच्या रिचार्जच्या किमतीत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Reliance jio कडून 1 रुपयाचा रिचार्ज सादर, 395 रुपयांमध्ये 84 दिवसांचा प्लॅन
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : Vi, Airtel, Reliance Jio ने अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. या कंपन्यांच्या रिचार्जच्या किमतीत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिथे आधी 75 रुपयांमध्ये रिचार्ज करता येत होता तोच रिचार्ज प्लॅन आता 99 रुपयांचा आहे. मात्र या वाढीनंतर अवघ्या काही दिवसांनी रिलायन्स जिओने 1 रुपयाचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. (Reliance jio offers Rs 1 recharge, 84 days plan at Rs 395)

मुकेश अंबानींच्या मालकीच्या कंपनीने भारतीय युजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे, ज्या अंतर्गत युजर्स केवळ 1 रुपयाच्या साध्या रिचार्जवर 100 MB डेटा मिळवू शकतात. मात्र हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर अद्याप लिस्ट करण्यात आलेला नसला तरी या रिचार्जचा पर्याय MyJio अॅपवर पाहायला मिळत आहे.

इतरही स्वस्त रिचार्ज उपलब्ध

हा Jio चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त जिओ प्लॅन आहे, जो 4G पॅकसह येतो. हा प्लॅन अशा वेळी आला आहे जेव्हा कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये सुमारे 20 टक्क्यांनी वाढ केली होती. सध्या, जर तुम्हाला एका महिन्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन हवा असेल, तर तुम्हाला 155 रुपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेला प्लॅन मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना फक्त 2 GB डेटा आणि 155 रुपयांचा प्लान मिळतो.

395 रुपयांमध्ये 84 दिवसांचा रिचार्ज

दुसरीकडे, जर तुम्ही फोनमधील इंटरनेटचा वापर कमी केला आणि तुम्हाला केवळ कॉलिंगसाठी प्लॅन हवा असेल तर तुम्हाला 395 रुपयांचा रिचार्ज प्लॅन मिळू शकतो, ज्यामध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता आणि एकूण 6 GB इंटरनेट डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 1000 एसएमएस मिळतात.

Jio च्या प्रीपेड प्लॅन्सवर तगडा कॅशबॅक

टेलिकॉम दिग्गज कंपनी Jio चे नवीन प्रीपेड प्लॅन्स या आठवड्याच्या सुरुवातीला लाइव्ह झाले आहे. दूरसंचार कंपनीने सादर केलेले 20 टक्के कॅशबॅक प्लॅन्सदेखील सुधारित केले आहेत. यापूर्वी या प्लॅन्सची ​​किंमत 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपये होती. जे Jio युजर्स या ऑफरची निवड करतील ते 200 रुपयांपर्यंत कॅशबॅकसाठी पात्र आहेत. जिओने म्हटले आहे की, रिचार्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत कॅशबॅक युजर्सच्या खात्यात जमा होईल.

युजर्स रिलायन्स रिटेल चॅनेल आणि जिओ रिचार्ज, JioMart, Reliance Smart, Ajio, Reliance Trends, Reliance Digital आणि Netmeds सह इतर स्टोअरद्वारे कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. Jio ची 20 टक्के कॅशबॅक ऑफर आता 299 रुपये, रुपये 666 आणि रुपये 719 रुपयांच्या सुधारित प्लॅन्सवर लागू होईल. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS उपलब्ध असतील. या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचा अॅक्सेस देखील उपलब्ध आहे. 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स, दररोज 100 SMS आणि Jio अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Reliance jio offers Rs 1 recharge, 84 days plan at Rs 395)