JIO Laptop 16 हजार 500 रुपयांत लॅपटॉप, फीचर्स काय आणि कुठे मिळतोय पाहा

तुम्ही जर लॅपटॉप घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जिओबुक तुम्हाला अवघ्या 16,499 रुपयांना मिळणार आहे. चला जाणून घेऊयात लॅपटॉपचे फीचर्स आणि इतर बाबी..

JIO Laptop 16 हजार 500 रुपयांत लॅपटॉप, फीचर्स काय आणि कुठे मिळतोय पाहा
फक्त १६ हजार रुपयात मिळणाऱ्या जिओ लॅपटॉपचे फीचर्स आहेत तरी काय? नेमका कुठे मिळतोय हा लॅपटॉप पाहा
| Updated on: Aug 01, 2023 | 10:54 PM

मुंबई : जिओ कंपनीने JioOS ऑपरेटिंग सिस्टम असलेला जिओबुक नुकताच लाँच केला आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून याचं डिझाईन करण्यात आलं आहे. जिओबुकची किंमत फक्त 16499 रुपये इतकी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हा जिओबुक परवडणारा आहे.वजनाने हलका असलेल्या या लॅपटॉपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लॅपटॉपचं वजन अवघ 990 ग्रॅम इतकं आहे.हा देशातील पहिला 4जी एलटीई सीमसह प्री-लोडेड लॅपटॉप असणार आहे. हा लॅपटॉप तुम्हाला 5 ऑगस्टपासून मिळणार आहे. तुम्ही हा लॅपटॉप वेगवेगळ्या माध्यमातून विकत घेऊ शकता. यात रिलायन्स डिजिटल ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्सचा समावेश आहे. अॅमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवरूनही तुम्ही हा लॅपटॉप मागवू शकता.

रिलायन्स रिटेलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “ऑनलाईन क्लासमध्ये भाग घेणं असो की कोडिंग शिकणं असो..योगा स्टुडिओ सुरु करायचा असो की ऑनलाईन ट्रेडिंग..जिओबुक प्रत्येक कामात मदतीला येणार आहे. आमचा प्रयत्न असा आहे की या माध्यमातून तुम्हाला नवीन काही शिकता येईल. जिओबुकमुळे शिकण्याच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल होणार आहे. या माध्यमातून नवीन स्किल शिकता येईल.”

जिओबुकचे फीचर्स काय आहेत?

जिओबुकमध्ये मीडियाटेक एमटी 8788 प्रोसेसरसह 11.6 इंचाचा अँटी ग्लेयर एचडी स्क्रिन दिली आहे. लॅपटॉपमध्ये 4जी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणार आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवू शकता. किबोर्ड बऱ्यापैकी मोठा असून काम करण्यास सुलभ असणार आहे.

जिओबुक एचडी वेबकॅमसह येईल. यात वायरलेस स्कॅनिंग आणि प्रिंटिंग सुविधा असणार आहे. त्याचबरोबर एक्स्टर्नल डिस्प्लेसोबत कनेक्ट केला जाऊ शकतो. यात इंटिग्रेटेड चॅट बॉट आहे. मल्टी टास्किंग स्क्रिनसह जिओ अॅपच्या माध्यमातून शैक्षणिक कंटेंटही एक्सेस करता येणार आहे.

कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी

कनेक्टिव्हिटीसाठी यात 2 युएसबी पोर्ट्स, 1 मिनी एचडीएमआय पोर्ट, हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.0 आणि 4 जी ड्युल बँड वायफाय दिलं आहे. लॅपटॉपला 4000 एमएएच बॅटरी दिली आहे. ही बॅटरी आरामात 8 तासापर्यंत चालून शकते असा कंपनीने दावा केला आहे.