AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सॲपवर +92, +82, +62 सारख्या नंबर्सवरून कॉल येतात का? फसवणूक होण्यापूर्वी असं काम करा

WhatsApp Calls : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबर्सवरून कॉल येत आहेत. +92, +82, +62 अशा नंबर्स पुढे दिसतात. त्यामुळे अनेकांना फसवणूक होईल अशी भीती वाटत आहे. यासाठी व्हॉट्सॲपवर खास फीचर देण्यात आलं आहे.

व्हॉट्सॲपवर +92, +82, +62 सारख्या नंबर्सवरून कॉल येतात का? फसवणूक होण्यापूर्वी असं काम करा
व्हॉट्सॲपवर +92, +82, +62 नंबरवरून येणाऱ्या कॉल्सचा सुळसुळाट, फटका बसण्यापूर्वी असं कराल सेटिंग
| Updated on: Jul 29, 2023 | 5:57 PM
Share

मुंबई : तंत्रज्ञानाच्या सर्व गोष्टी सुलभ होत असल्या तरी फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून फसवणूक होत असल्याने स्थानिक पोलीसही हतबल आहेत. तंत्रज्ञानाबाबत तितकी माहिती नसल्याने अकार्यक्षमता दिसून येत आहे. त्यामुळे आपल्यासोबत काही चुकीची घटना घडू नये यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबर्सवरून कॉल येण्याचा घटना वाढल्या आहेत. आपला नंबर त्यांच्याकडे कसा आला याबाबतही अनेकांना प्रश्न पडला आहे. हे कॉल भारतातून नाही तर इतर देशांच्या कोडसह येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही जण वर्च्युअल नंबर्सच्या माध्यमातूनही लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहे.

दर दोन दिवसांनी +92, +82, +62 या कोडवरून फोन येत आहेत. त्यामुळे युजर्संमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी एका युजर्सला +92 या नंबरवरून कॉल आला होता. यात फुकटात आयफोन 14 जिंकण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यांनी दिलेल्या स्किममध्ये अडकल्यानंतर त्याला लाखो रुपये गमवण्याची वेळ आली. त्यामुळे शेवटी पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲपने असे कॉल ब्लॉक करण्याचा सल्ला दिला आहे.

नेमके कुठून येत आहेत कॉल्स?

व्हॉट्सॲपने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, युजर्संना मलेशिया, केनिया, वियतनाम आणि इथोपिया येथून आयएसडी कॉल्स येत आहेत. या काल्समागे नेमकं काय प्रकरण आहे हे मात्र उघड नाही. पण या माध्यमातून फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. इतकंच काय तर कॉल्स अवघ्या काही सेकंदात कट होत आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा कॉल करण्याच्या भानगडीत पडू नका. अन्यथा फसवणूक होऊ शकते.

कसे कराल हे अनोळखी कॉल्स बंद

व्हॉट्सॲपने सांगितलं की, “आम्ही युजर्संना सुरक्षा देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. यासाठी आम्ही एआय आणि इतर तंत्रज्ञानांची मदत घेत आहोत.” मार्च महिन्यात कंपनीने 47 लाख अकाउंट्स बंद केले आहेत. त्याचबरोबर कंपनी अनोळखी नंबर्स कॉल्स सायलेंट करण्यासाठी एक फीचर्स दिलं आहे.

असे कराल अनोळखी कॉल्स सायलेंट

व्हॉट्सॲप ओपन करा आणि त्याच्या सेटिंगमध्ये जा. तिथे गेल्यानंतर प्रायव्हसी हे ऑप्शन निवडा आणि कॉल्स ऑप्शनवर जा. या ठिकाणी तुम्हाला Silent Unknown Calls हा पर्याय मिळेल. येथे दिलेला टॉगल ऑन करा तेव्हा ते ग्रीन दिसेल. म्हणजेच तुमचं काम झालं असं समजा.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.