
स्क्रीन ॲडिक्शनचे प्रमाण वाढले आहे. मुलं सतत मोबाईल पाहण्यात मश्गुल झालेली असतात आणि पालकही ती रडू नयेत, खेळतायत म्हणून बिनधास्त त्यांच्याकडे आपला मोबाईल सुपूर्द करीत आहेत. यामुळे भारतीय मुलांचे स्क्रीन ॲडिक्शनचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या कारणांनी भारतीय मुलांचा स्क्रीन टाईम वाढला असून हे एक प्रकारचे व्यसन असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात सजग पालकांनी आणि आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञांनी हा धोका वेळीच ओळखा आणि मुलांना मैदानात खेळायला पाठवा असे म्हटले आहे. कारण जास्त वेळ मोबाईल पाहण्याने मुलांना मल्टीपल डिसऑर्डरचे आजार होऊ शकतात असे म्हटले जात आहे. सायकॉलॉजिस्ट डॉ.एरीक सिग्मन यांनी जर्नल ऑफ दि इंटरनॅशनल चाईल्ड न्युरोलॉजी असोसिएशनमध्ये एक प्रबंध प्रकाशित केला होता. विविध प्रकारच्या स्क्रीन पाहण्यांचा मुलांच्या वाढत्या वेळेला ‘व्यसन’असे संबोधले जात आहे. स्वत:हून किंवा प्रॉब्लमॅटिक पद्धतीने विविध प्रकारच्या मोबाईल, टीव्ही,स्मार्ट वॉच, टॅब, लॅपटॉप, गेम, किंडल अशा विविध माध्यमातून स्क्रीन पाहण्यात गुंतलेल्या...