
भारतीय लष्कर आता केवळ मैदानात शस्त्रच नाही तर तांत्रिक आणि तंत्रज्ञानाच्या मोर्चावर पण एक कदम पुढे जात आहे. शत्रूंवर मात करण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पहिल्यांदाच मेड इन इंडिया मोबाईल सिस्टिम संभवचा (Sambhav Indian Army) वापर करण्यात आला होता. पायदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वतः याचा खुलासा केला होता. आता त्याचे अपग्रेडेट व्हर्जन पण तयार झाल्याची माहिती त्यांनी दिली. हा नवीन संभव आता अधिक सुरक्षित आणि आधुनिक झाला आहे.
व्हॉट्सॲपवरुन का उठला विश्वास?
देशभरात फाईल शेअर करण्यासाठी व्हॉट्सॲप अथवा टेलिग्रॅमचा वापर होतो. या परदेशी ॲप्सचा वापर करणे अनेक देशांना धोक्याचे ठरले आहे. त्यामुळे महत्त्वाची माहिती पब्लिक डोमेनमध्ये येण्याची भीती खरी ठरली आहे. मध्य-पूर्वेतील युद्धात तर हमास, हिजबुल्ला आणि इतर संघटनांच्या म्होरक्यांना टिपण्यासाठी सुद्धा या ॲप्सचा वापर झाल्याचे दिसून आले. यामुळे हेरगिरीची भीती कायम राहते. लष्करासाठी हा मोठा धोका ठरू पाहत होता.
त्यामुळे भारताने लष्करासाठी पूर्णपणे स्वेदशी आणि सुरक्षित ‘संभव’ सिस्टिम स्वीकारली. ही सिस्टिम 5G मोबाइल नेटवर्कवर चालते. यामध्ये मल्टि लेअर एन्क्रिप्शनची सुविधा आहे. या नवीन सिस्टिममुळे फोन कॉल्स अथवा डेटा कोणत्याही परिस्थितीत लीक होत नाही. तसा प्रयत्न केला तरी तो यशस्वी ठरत नाही.
Sambhav ची वैशिष्ट्ये काय?
या सिस्टिमचे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे सध्याच्या M-Sigma ॲप, व्हॉट्सॲपप्रमाणेच ती चॅटिंग, कॉलिंग, मोठ्या फाईल शेअरिंगची सुविधा देते. यामध्ये इतकाच फरक आहे की, ही सिस्टिम भारतात विकसीत आहे. ती एंड-टू-एंड सिक्योरिटीसह येते. यामध्ये कॉलिंगसह एसएमएस आणि फाईल शेअरिंगपर्यंत सर्व सुविधा मिळतात. भारतीय लष्करासाठी या संभवचे अनेक युनिट्स तयार करण्यात आले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनसोबत ज्यावेळी बैठक झाली, त्यावेळी या 5G स्मार्टफोनचा वापर करण्यात आला होता.
अमेरिकेकडे त्यांची लष्करी संरक्षण संवाद प्रणाली आहे. तर रशिया, चीन हे सुद्धा त्यांचे लष्करी नेटवर्क आणि सुरक्षित मोबाईल ॲप्सचा वापर करतात. आता भारतही या यादीत सहभागी झाला आहे. संभव हा स्मार्टफोन वापरात आल्यापासून या परदेशी मोबाईल आणि ॲप्सवरील निर्भरता संपली आहे.