Galaxy Fold : सहा कॅमेरे, दोन बॅटरी, सॅमसंगचा फोल्डिंग स्मार्टफोन लाँच

| Updated on: Oct 02, 2019 | 11:09 AM

सॅमसंगने आपला नवीन फोल्डिंग स्मार्टफोन Galaxy Fold लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 1 लाख 64 हजार 999 रुपये आहे.

Galaxy Fold : सहा कॅमेरे, दोन बॅटरी, सॅमसंगचा फोल्डिंग स्मार्टफोन लाँच
Follow us on

मुंबई : सॅमसंगने आपला नवीन फोल्डिंग स्मार्टफोन Galaxy Fold लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 1 लाख 64 हजार 999 रुपये आहे. Samsung Galaxy Fold भारतात अधिकृतपणे विक्री होणारा पहिला फोन आहे. याशिवाय फक्त Huawei Mate X फोल्डिंग फोन आहे जो यानंतर बाजारात विकला जाईल.

या प्रीमिअम स्मार्टफोनमध्ये 4.6 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले आणि 7.3 इंचाची फोल्डेबल स्क्रीन आहे. Samsung Galaxy Fold च्या मोठ्या स्क्रीनचा उपयोग करताना थ्री-वे मल्टीटास्किंग करु शकतात. सध्या हे फीचर फक्त व्हॉट्सअॅप, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि यूट्यूब प्रीमिअमवर मिळेल. या फीचरला App Continuity म्हटलं जात आहे. सॅमसंगने हे फीचर गुगल आणि अँड्रॉईड डेवलपर्ससोबत मिळून तयार केलं आहे, असं म्हटलं जात आहे.

Galaxy Fold मध्ये दोन बॅटरी

Samsung Galaxy Fold मध्ये Qualcomm Snapdragon 855 प्रोसेसर दिला आहे. मल्टीटास्किंगसाठी यामध्ये 12GB रॅम आणि 512GB चा स्टोअरेज आहे. तसेच हिंज स्मार्टफोन उघडण्यासाठी आणि बंद करण्याची सुविधाही दिली आहे. हिंजेसमध्ये इंटरलॉक्ड गिअर्स लावलेले आहे. ज्यामुळे फोन उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी सोयीस्कर होते.

या प्रीमिअम फोनमध्ये एकूण 6 कॅमेरे आहेत. तीन मागे, एक फ्रंट आणि दोन फोनच्यामध्ये दिलेले आहेत. तुमचा फोन ओपन असो वा नसो तुम्ही कॅमेराचा वापर करु शकता. स्मार्टफोनमध्ये दोन बॅटरी देण्यात आलेल्या आहेत. बॅटरी क्षमता एकूण 4,380mAh दिली आहे.