सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि A37 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या त्यांची किंमत
सॅमसंग लेक्सी A57 5G आणि A37 5G आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. कंपनी यावर एक्सचेंज बोनस आणि कॅशबॅक ऑफर्स देखील देत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

सॅमसंग कंपनीने त्यांचे नवीन गॅलेक्सी A सीरीजमधील दोन स्मार्टफोन, गॅलेक्सी A57 5G आणि गॅलेक्सी A37 5G, भारतात विक्रीसाठी लाँच केले आहेत. दोन्ही फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स देतात. तर या फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये दीर्घकालीन सॉफ्टवेअर अपडेट्सचे आश्वासही दिले आहे. लाँचसोबत आकर्षक ऑफर्सही दिल्या जात आहेत. चला तर मग या दोन्ही स्मार्टफोनच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.
सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि A37 5G भारतातील किंमती
गॅलेक्सी A57 5G च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 56 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. तर 12GB रॅम व्हेरिएंट 62 हजार 499 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन ऑसम नेव्ही, ऑसम आयसीब्लू आणि ऑसम लिलॅक या रंगांमध्ये येतो.
व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत
तर दुसरीकडे गॅलेक्सी A37 5G च्या 8GB आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 41 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. तर 12GB रॅम आणि 256GB चे मॉडेल्स देखील उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 47 हजा 499 रूपये आणि 52 हजार 499 रूपये आहे. दोन्ही फोन भारतात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
डिस्प्ले आणि कार्यप्रदर्शन फिचर्स
सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि गॅलेक्सी A37 5G स्मार्टफोन्समध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED+ डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले स्मूथ स्क्रोलिंग आणि एक उत्तम व्हिज्युअल अनुभव देतो. हे फोन्स एक्सिनोस प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत, जे मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी उत्कृष्ट कामगिरी देतात.
दोन्ही डिव्हाइसेसमध्ये आधीपासूनच One UI 8.5 इंस्टॉल केलेले आहे आणि कंपनी सहा जनरेशनपर्यंत अँड्रॉइड अपडेट्स देण्याचे आश्वासन देते. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना फोन अधिक दीर्घकाळ वापरासाठी एक उत्तम पर्याय बनवते.
ऑफर आणि सवलतीचे फायदे
सॅमसंगने या स्मार्टफोन्ससोबत अनेक आकर्षक ऑफर्सही सादर केल्या आहेत. ग्राहकांना 5,000 रूपयांपर्यंतचा अपग्रेड बोनस मिळू शकतो, ज्यामुळे सुरुवातीची किंमत कमी होते.
याव्यतिरिक्त, निवडक बँक आणि UPI व्यवहारांवर 3,000 पर्यंतचा कॅशबॅकही दिला जात आहे. कंपनी 24 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI चा पर्यायही देत आहे, ज्यामुळे एक रक्कमी पेमेंट न करता फोन खरेदी करता येतो. EMI चा पर्याय निवडणाऱ्यांना 3,000 रूपयांचा अतिरिक्त अपग्रेड बोनसही मिळतो.
दोन्ही स्मार्टफोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, निवडक स्टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. कंपनीने ‘ट्रिपल झिरो’ योजना देखील सादर केली आहे, ज्यामध्ये शून्य डाउन पेमेंट आणि शून्य व्याज दिले जाते. ज्या ग्राहकांना सोप्या EMI मध्ये फोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, ही उपकरणे रिटेल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध सुद्धा आहेत.