AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samsung Galaxy Unpacked 2022: आज सॅमसंगचा मेगा इव्हेंट, कोणती उत्पादनं लाँच होणार, जाणून घ्या…

Samsung Galaxy Unpacked 2022 : सॅमसंगच्या या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 असे दोन मोठे फ्लॅगशिप लाँच होणार आहेत. हे दोन्ही फोन फोल्ड करण्यायोग्य असतील. 

Samsung Galaxy Unpacked 2022: आज सॅमसंगचा मेगा इव्हेंट, कोणती उत्पादनं लाँच होणार, जाणून घ्या...
Samsung Galaxy Unpacked 2022Image Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 10, 2022 | 12:47 PM
Share

मुंबई : सॅमसंगचा (Samsung) आज म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी एक मेगा इव्हेंट होणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील या कार्यक्रमाचे नाव Galaxy Unpacked (Samsung Galaxy Unpacked 2022) आहे. सॅमसंगच्या या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 असे दोन मोठे फ्लॅगशिप लाँच होणार आहेत. हे दोन्ही फोन फोल्ड करण्यायोग्य असतील. हे Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 ची अपग्रेड केलेली आवृत्ती असेल. सॅमसंगचा इव्हेंट आज संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. तुम्ही सोशल मीडिया हँडल आणि सॅमसंगच्या वेबसाइट व्यतिरिक्त Samsung च्या YouTube चॅनेलवर हा इव्हेंट पाहू शकता. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Samsung Galaxy Z Fold 4 च्या 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत (Rate) 1,799 युरो म्हणजेच सुमारे 1,46,400 रुपये असेल. त्याच वेळी, 512 GB ची किंमत 1,919 युरो म्हणजेच सुमारे 1,56,200 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. Galaxy Z Flip 4 च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 1,109 युरो म्हणजेच सुमारे 90,300 रुपये असू शकते. त्याच वेळी, या फोनच्या 256 जीबी (GB) मॉडेलची किंमत 1,169 युरो म्हणजेच जवळपास 95,100 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

किंमत किती?

Samsung Galaxy Watch 5 (40mm) ची सुरुवातीची किंमत 299 युरो म्हणजेच सुमारे 24,300 रुपये असू शकते. त्याच वेळी, Galaxy Watch 5 Pro (45mm) ची सुरुवातीची किंमत 469 युरो म्हणजेच सुमारे 38,200 रुपये असू शकते. एका नवीन रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की Samsung Galaxy Buds 2 Pro ची किंमत $230 म्हणजेच जवळपास 18,300 रुपये असू शकते.

अधिक माहिती जाणून घ्या…

Samsung Galaxy Z Fold 4 बद्दल एक माहिती आहे की यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 7.6-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स प्राइमरी डिस्प्ले मिळेल. दुसरा डिस्प्ले 6.2-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी ओ कव्हर डिस्प्ले असेल. फोनमध्ये एलईडी फ्लॅश लाईटसह तीन रियर कॅमेरे असतील. या फोनमध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा देखील उपलब्ध असेल. फोनसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस + संरक्षण उपलब्ध असेल.

8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज

Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल. Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह फोनला 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज मिळेल. Galaxy Z Flip 4 सह 12-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल आणि तो चार रंगांमध्ये सादर केला जाईल.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?