सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनवर 14 हजार रुपयापर्यंत सूट

सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनवर 14 हजार रुपयापर्यंत सूट

मुंबई : पेटीएमने आपल्या प्लॅटफॉर्मवर सॅमसंगच्या सुपर सेलचे आयोजन केले आहे. या सेलच्या दरम्यान नवीन सॅमसंग गॅलेक्सी S10 सीरिज फोनवर 14 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली आहे. कॅशबॅकशिवाय पेटीएमने नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरही दिली आहे. ही कॅशबॅक ऑफर तुमच्या पेटीएमवर क्रेडिट केली जाणार. तसेच सॅमसंगने गॅलेक्सी S10 E वर 9 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली आहे.

पेटीएमवर आयोजित करण्यात आलेल्या सेलमध्ये S10 मधील 8 GB रॅम + 512 GB स्टोअरेज व्हेरिअंटची किंमत 84 हजार 900 रुपये आहे. यासोबतच त्यावर 14 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. यासाठी तुम्हाला MOBSAM14K या प्रोमोकोडचा वापर करावा लागणार. यानंतर तुम्हाला हा व्हेरिअंट 70 हजार 900 रुपयामध्ये मिळेल.

128 GB व्हेरिअंटची किंमत 66 हजार 900 रुपये आहे. यावर ग्राहकांना 11 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. यासाठी तुम्हाला MOBSAM11K या प्रोमोकोडचा वापर करावा लागेल. कॅशबक ऑफरनंतर फोनची किंमत 55 हजार 900 रुपये होणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S10 E स्मार्टफोनवर 9 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. यामध्ये फोनची किंमत 55 हजार 900 रुपय आहे. ऑफरमध्ये 46 हजार 900 रुपये मिळणार आहे. तसेच गॅलेक्सी S10 प्लसच्या 128GB आणि 512GB व्हेरिअंटवर 6 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. कॅशबॅकनंतर या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 67 हजार 900 रुपये आणि 85 हजार 900 रुपये होणार आहे. या दोन्ही फोनची वास्तविक किंमत 73 हजार 900 रुपये आणि 91 हजार 900 रुपये आहे.

गेल्यावर्षी लाँच झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 वरही  6 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली आहे. कॅशबॅकनंतर 128 जीबी मॉडेलची किंमत 61 हजार 900 रुपये आणि 512 जीबी मॉडेलची किंमत 71 हजार 900 रुपये होणार आहे. या फोनची मूळ किंमत अनुक्रमे 67 हजार 900 रुपये आणि 77 हजार 900 रुपये आहे.

दरम्यान, या शिवायही अनेक सॅमसंगच्या स्मार्टफोनवर ऑफर देण्यात आली आहे. तुम्ही पेटीएमवर जाऊन पाहू शकता.

Published On - 8:10 pm, Thu, 9 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI