Samsung चा ग्राहकांना दणका, ‘या’ नव्या Smartphones सोबत Charger मिळणार नाही

| Updated on: Jan 22, 2021 | 11:49 PM

अ‍ॅपल कंपनीने दोन महिन्यांपूर्वी त्यांची आयफोन सिरीज 12 लाँच केली होती. त्यावेळी कंपनीने घोषणा केली होती की, कंपनी आयफोन 12 सोबत चार्जिंग अडॅप्टर आणि मोफत इयरफोन्स दिले जाणार नाहीत

1 / 5
अ‍ॅपल कंपनीने दोन महिन्यांपूर्वी त्यांची आयफोन सिरीज 12 लाँच केली होती. त्यावेळी कंपनीने घोषणा केली होती की, कंपनी आयफोन 12 सोबत चार्जिंग अडॅप्टर आणि मोफत इयरफोन्स दिले जाणार नाहीत. तेव्हा सॅमसंग कंपनीने अॅपल कंपनीला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं.

2 / 5
अॅपल कंपनीला ट्रोल करणाऱ्या सॅमसंगने आता अॅपलच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. कारण कंपनीने आता फैसला केला आहे की, ते आता Samsung Galaxy Series मधील कोणत्याही स्मार्टफोनसोबत चार्जर देणार नाहीत.

3 / 5
कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी सिरीजसोबत चार्जर न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांना प्रश्न पडला आहे की, आता फोन चार्ज कसा करायचा? परंतु कंपनीने याबाबत म्हटलं आहे की, "युजर्सना चार्जरची गरज नाही".

4 / 5
SamSung कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, "जगभरातील बहुतांश Samsung Galaxy युजर्स त्यांच्या जुन्या अॅक्सेसरीजचाच वापर करतात. तसेच अनेक युजर्स रीसायकलिंगला (पूनर्निमिती) प्रोत्साहन देत आहेत. युजर्सनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि आम्ही त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत".

5 / 5
कंपनीने स्पष्ट केलं आहे की, आगामी काळात त्यांच्याकडून Samsung Galaxy सिरीजमधील कोणत्याही स्मार्टफोनसोबत चार्जर दिला जाणार नाही. कंपनीने सांगितलं आहे की, "आता त्यांच्या हँडसेटसोबत मोफत दिले जाणारे इअरफोन्सही हँडसेटच्या बॉक्समधून हटवण्यात आले आहे".