ना 100, ना 200, सॅमसंग आणणार तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन, व्हिडीओ रेकॉर्डिंगची क्वालिटीही भन्नाट

| Updated on: Dec 06, 2020 | 10:15 PM

सॅमसंग कंपनी आता 100 किंवा 200 नाही तर तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल तयार करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे (Samsung may be working on a 600mp camera sensor).

ना 100, ना 200, सॅमसंग आणणार तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन, व्हिडीओ रेकॉर्डिंगची क्वालिटीही भन्नाट
Follow us on

मुंबई : मोबाईलमधील कॅमेरा हा आजच्या काळात अनेकांच्या जीवनाश्यक घटकांपैकी एक बनला आहे. आयुष्यातील कोणत्याही चांगल्या क्षणांना आठवण म्हणून कैद करुन ठेवण्यात मोबाईलचा कॅमेरा उपयोगी पडतो. त्यामुळेच आता सर्वाधिक लोक चांगल्या क्वालिटीचा आणि जास्त मेगापिक्सचा कॅमेरा असलेला मोबाईल खरेदी करतात. मात्र, आम्ही जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला कदाचित मोठा आश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण सॅमसंग कंपनी आता 100 किंवा 200 नाही तर तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल तयार करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे (Samsung may be working on a 600mp camera sensor).

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर जगात आज कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असं म्हणतात ते खरं आहे. लोकांनी आतापर्यंत 100 मोगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल वापरला आहे. मात्र, तब्बल 600 मेगापिक्सलचा कॅमेरा म्हणजे एक चमत्कारच मानला जाईल. कॅमेरा सेन्सर जितका मोठा असेल तितकीच व्हिडीओची क्वालिटीदेखील चांगली असेल. 600 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यात आपण 4K आणि 8K पर्यंत झूमकरुन व्हिडीओ रेकॉर्ड करु शकतो.

दरम्यान, मोबाईलचा कॅमेरा 600 मेगापिक्सलची असेल तर त्या फोटोची साईज देखील तितकीच मोठी असेल. याचा अर्थ जास्त मेगापिक्सल कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये मेमरी देखील जास्त हवी. सॅमसंग देखील याबाबत विचार करुनच स्मार्टफोनची निर्मिती करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सॅमसंगने अशाप्रकारच्या मोबाईल निर्मितीसाठी काम सुरु केलं असलं तरी या मोबाईलला मार्केटमध्ये येण्यास बराच वेळ लागू शकतो. दरम्यान, सॅमसंगकडून सध्यातरी 600 मेगापिक्सल कॅमेऱ्याबाबत अधिकृत अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही (Samsung may be working on a 600mp camera sensor).

संबंधित बातम्या :

नवीन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरसह Realme, Oppo आणि Xiaomi चे स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर

256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर