नवीन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरसह Realme, Oppo आणि Xiaomi चे स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर

क्वालकॉमने स्मार्टफोन्ससाठी नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन चिपसेट Qualcomm Snapdragon 888 ची घोषणा केली आहे.

नवीन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरसह Realme, Oppo आणि Xiaomi चे स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 3:02 PM

मुंबई : क्वालकॉमने 1 डिसेंबपपासून अ‍ॅन्युअल स्नॅपड्रॅगन समिट 2020 ची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये कंपनीने स्मार्टफोन्ससाठी नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन चिपसेट Qualcomm Snapdragon 888 ची घोषणा केली आहे. हा प्रोसेसर Snapdragon 865 चं पुढील व्हर्जन असणार आहे. (Realme, Oppo and Xiaomi teases smartphone powered by qualcomm snapdragon 888 processor)

या प्रोसेसरची घोषणा होताच अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी Snapdragon 888 प्रोसेसरसह स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे, यामध्ये प्रामुख्याने रियलमी, ओप्पो आणि शाओमी या कंपन्या सर्वात पुढे आहेत.

रियलमीचे सोशल मीडियावरुन Snapdragon 888 बाबबतचे संकेत

Realme चीनचे सु की चेज आणि इंडिया/युरोप हेड माधव सेठ यांनी Qualcomm Snapdragon 888 सह स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये ‘8_ _’ असं लिहिलं आहे. त्यावरुन अंदाज लावला जातोय की, कंपनीचा पुढील स्मार्टफोन नव्या प्रोसेसरवर बेस्ड असेल.

Oppo Find X स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटवर बेस्ड असण्याची शक्यता

ओप्पो (Oppo) कंपनी सध्या त्यांचा नवीन स्मार्टफोन सीरिज Reno5 लाँचिंगच्या कामात व्यस्त आहे. त्याचदरम्यान कंपनीने अधिक अपडेट होत त्यांची स्मार्टफोन सीरिज Oppo Find X मधील पुढील फोन हा Snapdragon 888 चिपसेटवर बेस्ड असेल अशी घोषणा केली आहे. तसेच कंपनीने जाहीर केले आहे की, त्यांचा नवा Snapdragon 888 वर बेस्ड असलेला स्मार्टफोन पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहित लाँच केला जाईल.

शाओमीचीसुद्धा स्पर्धेत एंट्री, Mi11 मध्ये Snapdragon 888 प्रोसेसर?

रियलमी आणि ओप्पोप्रमाणे शाओमी कंपनीदेखील Snapdragon 888 वर बेस्ड असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ लेई जुन यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच त्यांचा स्मार्टफोन Mi11 लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये नवीन Snapdragon 888 प्रोसेसर असेल. कंपनीने या नव्या स्मार्टफोनबाबतची इतर माहिती, फिचर्स आणि किंमत अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.

पुढील वर्ष Snapdragon 888 चं?

रियलमी, ओप्पो आणि शाओमीसह इतरही अनेक कंपन्या नव्या Snapdragon 888 प्रोसेसरवर बेस्ड स्मार्टफोन लाँच करणार आहेत. त्यांनी त्यादृष्टीने प्रोसेसर बनवणाऱ्या कंपनीशी बातचित सुरु केली आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये Asus, Black Shark, Lenovo, LG, Meizu, Motorola, Nubia, Realme, OnePlus, Oppo, आणि Vivo सारख्या कंपन्या Snapdragon 888 प्रोसेसर असलेले स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी Snapdragon 865 प्रोसेसर लाँच करण्यात आला होता. या प्रोसेसरसह आतापर्यंत अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. आता Snapdragon 888 ची घोषणा करण्यात आली आहे. हा प्रोसेसर Snapdragon 865 चा सक्सेसर आहे. Snapdragon 888 हा प्रोससर Snapdragon X60 5G मॉडेमसह येतो. ज्यामध्ये सहाव्या जनरेशनचं क्वलकॉम एआय इंजिन आहे. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की, याचं नाव Snapdragon 875 असेल.

इतर बातम्या

देशातील 1.7 कोटी दुकानदारांना Paytm चं गिफ्ट, वॉलेटद्वारे केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही

पहिल्याच सेलमध्ये आऊट ऑफ स्टॉक, Micromax चा मेड इन इंडिया फोन म्हणतो ‘मी पुन्हा येईन!’

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? मग ही ट्रिक वापरा

(Realme, Oppo and Xiaomi teases smartphone powered by qualcomm snapdragon 888 processor)

Non Stop LIVE Update
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल.
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?.
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.