Micromax चा ‘हा’ किफायतशीर स्मार्टफोन 10 डिसेंबरपासून विक्रीस उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Micromax चा 'हा' किफायतशीर स्मार्टफोन 10 डिसेंबरपासून विक्रीस उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मायक्रोमॅक्सने नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत.

अक्षय चोरगे

|

Dec 06, 2020 | 3:28 PM

मुंबई : मायक्रोमॅक्सने (Micromax) नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. यापैकी Micromax IN Note 1 हा स्मार्टफोन 24 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. तर Micromax In 1b हा स्मार्टफोन 26 नोव्हेंबरपासून विक्रीस उपलब्ध केला जाणार होता. परंतु लॉजिस्टिक कारणांनी ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. (Micromax in 1b smartphone first sale from 10 december on flipkart)

या स्मार्टफोनची विक्री कधीपासून होणार आहे, याची ग्राहकांना प्रतीक्षा होती. कंपनीने नुकताच त्याबाबतचा खुलासा केला आहे. मायक्रोमॅक्सने सोशल मीडियावरुन Micromax In 1b च्या सेलबाबतची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टवर 10 डिसेंबरपासून हा मोबाईल विक्रीस उपलब्ध होणार आहे. या मोबाईलची किंमत 6,999 रुपयांपासून सुरु होते.

दरम्यान, 24 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या मायक्रोमॅक्स इन नोट 1 ला देशभरातील ग्राहकांची चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या स्मार्टफोनची देशात इतकी मागणी वाढली आहे की, पहिल्याच सेलमध्ये अवघ्या एक दिवसात हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक (Out Of Stock) झाला. त्यानंतर पुन्हा एकदा कंपनीने हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट्सवर विक्रीसाठी उपलब्ध केला.

Micromax In 1B चे स्पेसिफिकेशन्स

Micromax In 1B मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा हा दोन मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Micromax In Note 1 चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो G85T (MediaTek Helio G85T) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (इंटर्नल मेमरी) स्पेस देण्यात आली आहे. तसेच 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत 5 आणि दोन मेगापिक्सलचे अजून दोन कॅमेरे आहेत. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.

किंमत

मायक्रोमॅक्स इन नोट 1 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 12, 499 रुपये इतकी आहे. मायक्रोमॅक्स इन नोट 1 प्रमाणे मायक्रोमॅक्स इन 1 बी मध्येही दोन व्हेरियंट्स आहेत. मायक्रोमॅक्स इन 1 बी च्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये इतकी आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये इतकी आहे.

संबंधित बातम्या

नवीन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरसह Realme, Oppo आणि Xiaomi चे स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर

256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर

(Micromax in 1b smartphone first sale from 10 december on flipkart)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें