WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा

| Updated on: Jan 09, 2021 | 3:07 PM

युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत.

WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा
Follow us on

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, WhatsApp च्या या नव्या धोरणामुळे अनेक युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेकांनी WhatsApp च्या या अटी मान्य करण्याऐवजी WhatsApp वापरणं बंद करण्यास प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने Telegram आणि Signal या दोन अ‍ॅप्सना प्राधान्य दिलं जात आहे. परंतु टेलिग्राम वापरणाऱ्या तसेच आगामी काळात टेलिग्रामवर शिफ्ट होऊ असं ठरवलेल्या युजर्ससाठी वाईट बातमी आहे. कारण, नुकतीच अशी माहिती मिळाली आहे की, टेलिग्राम हे अ‍ॅप सुरक्षित नाही. (Security problem in Telegram App, Hackers can track your location through ‘People Nearby’ Feature)

ArsTechnica च्या रिपोर्टनुसार टेलिग्राम या अ‍ॅपवर तुमचं लोकेशन अगदी सहजपणे ट्रॅक केलं जाऊ शकतं. त्यामुळे हे अ‍ॅप सुरक्षित नाही. ArsTechnica च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, टेलिग्रामवरील ‘People Nearby’ या फिचरच्या मतदीने हॅकर्स तुमचं इक्जॅक्ट लोकेशन शोधू शकतात. ArsTechnica च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, टेलिग्राम हे अ‍ॅप युजर्सना त्यांच्या जियोग्राफिकल एरियानुसार लोकल ग्रुप बनवण्याची परवानगी देतं. अनेक स्कॅमर्स, हॅकर्स त्यांचं लोकेशन स्पूफ करुन अशा प्रकारच्या ग्रुप्समध्ये सहभागी होतात आणि बनावट बिटकॉईन इन्वेस्टमेंट, हॅकिंग टूल्स, चोरी केलेले सोशल सिक्युरेटी नंबर आणि अन्य स्कॅम्स चालवतात.

इंडिपेंडंट रिसर्चर अहमद हसन यांनी ArsTechnica ला एका ईमेलद्वारे सांगितले आहे की, अनेक युजर्सना हे माहीत नसतं की ते त्यांचं लोकेशन शेअर करत आहेत. अनावधानाने त्यांच्या घरचा पत्ता ते लोकांसोबत शेअर करत आहेत. एखादी महिला अशा प्रकारच्या ग्रुपमध्ये चॅट करत असेल तर अनवॉन्टेड युजर्सद्वारे तिला स्टॉक केलं जाऊ शकतं. बाय डिफॉल्ट ‘People Nearby’ फिचर बंद असतं. परंतु ते जर कोणी सुरु केलं तर ते खूप नुकसानकारक ठरेल.

या प्रकाराबाबत टेलिग्रामचं म्हणणं काय?

या फिचरबाबत अहमद हसन यांनी ईमेलद्वारे टेलिग्रामकडे विचारणा केली असता, त्यावर कंपनीने म्हटलं आहे की, ‘People Nearby’ सेक्शनमध्ये युजर्स स्वतःच त्यांच लोकेशन शेअर करतात. तसेच हे फिचर बाय डिफॉल्ट बंद असतं. आम्हालाही असं वाटतंय की काही ठराविक परिस्थितीत याद्वारे परफेक्ट लोकेशन शोधता येईल. परंतु दुर्दैवाने हा प्रकार आमच्या बग बाउंटी कार्यक्रमाद्वारे कव्हर करण्यात आलेला नाही.

कंपनीने दावा केला आहे की, हा प्रकार मोठा त्रासदायक नाही. पंरतु आम्ही तुम्हाला हाच सल्ला देऊ की, तुम्हाला गरज नसेल तर हे फिचर कायम बंदच ठेवा. जर तुम्ही तसं केलं नाहीत, तर तुमच्यासमोर अडचणी निर्माण होतील.

संबंधित बातम्या

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

Good News : आता WhatsAppच्या एकाच क्रमांकावरून चार डिव्हाइस चालणार; लवकरच नवे फीचर्स सेवेत

व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा

तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

WhatsApp वरुन आरोग्य विमा खरेदीही शक्य, काय आहे योजना?

(Security problem in Telegram App, Hackers can track your location through ‘People Nearby’ Feature)