Soldier Smart Tracker Watch | खास सैनिकांसाठी स्मार्ट वॉच, 8 वीच्या विद्यार्थ्यांची कमाल, आपत्तीकाळात शोधण्यास ठरेल उपयोगी

| Updated on: Jul 26, 2022 | 6:26 PM

Soldier Smart Tracker Watch | छोट्या शास्त्रज्ञांनी खास सैनिकांसाठी स्मार्ट वॉच तयार केली आहे. त्यामुळे आपत्तीकाळात सैनिकांना शोधण्यात यश येईल.

Soldier Smart Tracker Watch | खास सैनिकांसाठी स्मार्ट वॉच, 8 वीच्या विद्यार्थ्यांची कमाल, आपत्तीकाळात शोधण्यास ठरेल उपयोगी
छोट्या शास्त्रज्ञांची कमाल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Soldier Smart Tracker Watch | सीमेवर तैनात जवानांसाठी दोन वर्गमित्र विद्यार्थ्यांनी खास घड्याळ तयार केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत, नैसर्गिक आपत्तीचा जवानांना कायम सामना करावा लागतो. अलीकडे मणिपूर आणि डोंगराळ भागात भूस्खलनामुळे अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला. या गोष्टींमुळे जवानांचे नाहक बळी जाऊ नये आणि त्यांना लवकर शोधता यावे या प्रेरणेने ही मुलं झपाटून गेली. त्यांनी सैनिकांसाठी खास स्मार्ट वॉच ट्रॅकर ( Smart watch tracker ) तयार केला आहे, जो सैनिकांना शोधू शकणार आहे. हे स्मार्ट घड्याळ या सैनिकांना शोधण्यात आणि त्यांची सुटका करण्यात चांगली मदत करु शकते. वाराणसीतील आर्यन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हे स्मार्ट वॉट ट्रॅकर बनवलं आहे. दक्ष अग्रवाल आणि सूरज (Daksh Agarwal and Suraj)अशी या विद्यार्थ्यांची नावे असून ती इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहेत. या छोट्या शास्त्रज्ञांच्या या कमाल आयडियाने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

अवघ्या दोन हजारात गॅझेट

या छोट्या शास्त्रज्ञांचा हा प्रयोग चर्चिला जात आहे. हे वॉच सैनिक आणि नागरिकांना खूप उपयोगी ठरणार आहे. हे वॉच तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपयांचा खर्च आला आहे आणि ते बनवण्यासाठी एक आठवडा लागला आहे. या स्मार्ट वॉच ट्रॅकरमध्ये 3 व्होल्ट बटण सेल, रेडिओ ट्रान्समीटर रिसीव्हर, स्विच, घड्याळ आणि अलार्म वापरण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

असा होईल वापर

स्मार्ट सोल्जर ट्रॅकिंग वॉच ( Smart Soldier Tracking Watch ) भूस्खलनाच्या वेळी उपयोगी पडेल. ढिगाऱ्यात दबलेल्या सैनिकांना त्यामुळे शोधता येईल. बचाव पथकाला वेळीच माहिती मिळाल्याने सैनिकांचे आणि नागरिकांचे प्राण वाचवता येतील. या ट्रॅकिंग वॉचमध्ये दोन भाग आहेत. पहिला ट्रान्समीटर सेन्सर, जो जवानांच्या घड्याळात बसवलेला असेल. दुसरा रिसीव्हर अलार्म सिस्टम स्मार्ट घड्याळाच्या ट्रान्समीटर सेन्सरशी जोडलेला असेल. रिसीव्हर अलार्म सिस्टम ( Receiver Alarm System ) लष्कराच्या नियंत्रण कक्षात असेल. त्याची रेंज आता सुमारे 50 मीटर असेल. भूस्खलनावेळी एखादा नागरीक अथवा जवान ढिगाऱ्याखाली अडकलेला असेल तेव्हा घड्याळाच्या सेन्सर्सवर दबाव पडेल आणि ते सक्रिय होईल. त्यातून लगेचच रिसीव्हरला सिग्नल मिळतील. घड्याळातून पाठवलेला रेडिओ सिग्नल ( Radio signal ) प्राप्त होताच, कंट्रोल रूममधील अलार्म अॅक्टिव्ह होईल. ढिगाऱ्याखालील व्यक्तीच्या जसे जवळ जाल तसे सिग्नल मजबूत इशारा देईल. त्यामुळे आपत्तीकाळात त्वरीत मदत पोहचवणे आणि हुडकून काढणे सोपे होईल.