AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनच्या स्पिकरमधून आवाज कमी येतोय? मग लगेच करा हा घरगुती उपाय

अचानक फोनमधून कमी आवाज येत असल्याची तक्रार अनेक युजर करतात. पण, हे नक्की का होते याची अनेकांना कल्पना नसते. यामागे वेग-वेगळी कारणं असू शकतात.

फोनच्या स्पिकरमधून आवाज कमी येतोय? मग लगेच करा हा घरगुती उपाय
स्मार्टफोनImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 29, 2023 | 6:06 PM
Share

मुंबई,  स्मार्टफोन वापरताना त्याचे काही भाग घाण होतात. त्यापैकी सर्वात जास्त जर कोणत्या भागात घाण साचत असेल तर तो आहे स्मार्टफोनचा स्पीकर (Smartphone cleaning). स्पीकरमध्ये धूळ आणि घाण जमा होते. यामुळे मोबाईलचा आवाज कमी होतो, पण ते साफ करणे खूपच सोपे आहे. यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही. फक्त टूथब्रशने घरातील स्पीकर्स स्वच्छ होतील. आज आपण अशाच काही उपायांबद्दल जाणून घेऊया.

थिनर वापरा

फोनही थिनरने साफ केला जातो. तुम्हाला फक्त ब्रश वापरायचा आहे. स्पीकरच्या अतिवापरामुळे किंवा धूळीच्या ठिकाणी जास्त ठेवल्याने घाण येते. स्पीकर देखील पाण्यामुळे खराब होतात, त्यामुळे तुम्हाला कमी थिनर वापरावे लागेल. अतिवापरामुळे मदरबोर्डचे नुकसान होऊ शकते.

इअरबड्स देखील आहेत उपयुक्त

कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड्स वापरतात पण यामुळे स्पीकर्सही स्वच्छ होऊ शकतात. जास्त दाबाने साफसफाई केल्याने स्पीकर शक्यता असते. हलक्या हाताने ईयर बर्डस् वापरल्यास स्पिकर बऱ्यापैकी स्वच्छ होऊ शकतो.

कापसाने करा स्वच्छ

स्पीकर कापसाने सहज साफ करता येतो. स्पीकरच्या आतील भागापर्यंत पोहोचू शकेल अशा वस्तूवर कापूस लावा. तुम्ही कापसावर थोडे थिनर लावू शकता. जेणेकरून स्पीकर पूर्णपणे स्वच्छ होऊ शकेल.

स्वच्छ कापडाने पुसा

अनेक युजर्स स्मार्टफोन वापरताना योग्य ती काळजी घेत नाही. तसेच, त्याच्या देखभालीकडे देखील लक्ष देत नाही. परिणामी पोर्ट आणि स्पीकरमध्ये धूळ जमा व्हायला लागते. असे झाल्यास कॉलमध्ये देखील अडथळा येऊ शकतो. हे टाळायचे असल्यास स्मार्टफोन वेळोवेळी स्वच्छ सुती कापडाने स्वच्छ करावेत. यामुळे पोर्ट आणि स्पीकर स्वच्छ राहतात. परंतु, कापडाच्या पोर्टमध्ये सूत, रुई राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्मार्टफोनच्या स्पिकरची स्वच्छता करताना वापरयाचे कापड चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?