उन्हाळा सुरु होण्याआधी Air Conditioner ची करा सर्व्हिस, तुम्हाला मिळणार ‘हे’ फायदे
एसी योग्य वेळी सर्व्हिस केली तर ती सुरळीतपणे काम करते आणि कमी वीज वापरते. स्वच्छ फिल्टर आणि योग्य साफसफाई केल्याने कॉइल एसीला कमी पॉवरमध्ये चांगले कूलिंग प्रदान करण्यात मदत करते.

उन्हाळा येण्याआधी तुम्ही तुमच्या एअर कंडिशनरची म्हणजेच एसीची सर्व्हिस केली तर ते तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. नियमित मेंटेनन्स केल्याने तुमच्या एसीची कार्यक्षमता तर सुधारतेच, त्याच बरोबर विजेचा वापर देखील कमी होतो. अशातच तुम्ही अद्याप एसी सर्व्हिस न केल्याने तुम्हाला उन्हाळाच्या दिवसांमध्ये सुरुवातीपासून काही समस्यांना सामोरे जावे लागेल. तसेच तुम्हाला उन्हाळ्यात योग्य पॉवर कुलिंग देखील मिळणार नाही. यासाठी उन्हाळा येण्याआधी एसीची सर्व्हिस करून घेणे फायद्याचे ठरेल. चला तर मग एसी सर्व्हिस करण्याचे फायदे जाणून घेऊया.
AC सर्व्हिस लवकरच करणे
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, एअर कंडिशनर सर्व्हिस करण्यासाठी त्या-त्या कंपनीचे मेकॅनिक खूपच व्यस्थ असतात. ज्यामुळे तुम्ही एअर कंडिशनर सर्व्हिस करण्यासाठी जेव्हा कंपनीचा मेकॅनिक बुक करता तेव्हा तुम्हाला 2 किंवा 3 दिवसांचा कालावधी दिला जातो, त्यानंतर तुमचा एसी सर्व्हिस केला जातो. यासाठी सीझन सुरू होण्यापूर्वी एअर कंडिशनरची सर्व्हिस मिळाली तर, मेकॅनिक लगेच येऊन एसीची सर्व्हिस करून देतो.




सर्व्हिसमुळे विजेची बचत होईल
एसी योग्य वेळी सर्व्हिस केला तर तो सुरळीतपणे काम करतो आणि कमी वीज वापरतो. स्वच्छ फिल्टर आणि योग्य देखभाल केलेली कॉइल एसीला कमी पॉवरमध्ये चांगले कूलिंग प्रदान करण्यात मदत करतात.
थंड हवा आणि चांगली कामगिरी
उन्हाळ्यात एसी व्यवस्थित काम करणं खूप गरजेचं आहे. सर्व्हिस दरम्यान हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एसीमध्ये जमा होणारी धूळ उन्हाळा सुरू होण्यापूर्वी सर्व्हिसिंग करून साफ केली जाते आणि यामुळे हवेचा प्रवाह चांगला राहण्यास आणि थंड हवा मिळण्यास मदत होते.
AC ची सर्व्हिस केल्याने होणारे फायदे
एसीची वेळोवेळी सर्व्हिस न केल्यास गॅस गळती, तसेच कॉम्प्रेसर जास्त गरम होणे किंवा देखभालीसंबंधी इतर समस्या अशा अनेक तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. योग्य वेळी सर्व्हिस मिळाल्याने या समस्या कमी होतात. एसीमध्ये जास्त वेळ घाण साचत राहिल्यास त्यामुळे बुरशी, बॅक्टेरिया आणि दुर्गंधी येऊ शकते. सर्व्हिसिंग दरम्यान, ACच्या आत असलेले फिल्टर आणि कॉइल स्वच्छ केले जातात, ज्यामुळे ताजी आणि स्वच्छ हवा मिळते. त्यामुळे वेळोवेळी AC ची सर्व्हिस करत रहा.
येथून ACची सर्व्हिस करता येते
एअर कंडिशनर सर्व्हिसिंगसाठी तुम्ही अर्बन क्रूझर ॲप वापरू शकता. याशिवाय तुम्ही ज्या ठिकाणाहून एअर कंडिशनर खरेदी केले आहे, तिथून मेकॅनिकलाही कॉल करू शकता. तुम्ही तुमच्या घराजवळील एअर कंडिशनर मेकॅनिककडून तुमचे एअर कंडिशनर सर्व्हिस करून घेऊ शकता.